पश्चिम महाराष्ट्र

रायगड विश्‍ववंदनीय मॉडेल ठरेल - खासदार संभाजीराजे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - रायगडची अवस्था राजस्थानच्या किल्ल्यासारखी करायची नाही. रायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील. पुनर्बांधणीतून विश्‍ववंदनीय मॉडेल फोर्ट ठरेल, असा विश्‍वास खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

ते म्हणाले, ‘‘रायगडच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता पुनर्बांधणी होईल. यासाठी सहाशे कोटींचा निधी मंजूर आहे. रायगडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गडबडीत सादर झाला तरी त्यात तात्कालिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. गडाबरोबर लगतच्या गावांचा विकास महत्त्वाचा आहे. रायगडच्या परिक्रमेत २१ गावे मोडतात. नव्याने ८८ एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. रायगड हे मॉडेल फोर्ट ठरेल; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचाही इतिहास समोर यावा, यासाठी शिवसृष्टी साकारण्याचा विचार आहे.

इतिहासकारांनी पुरावे द्यावेत
रायगडच्या पुनर्बांधणीचे काम महत्त्वाकांक्षी आहे. याकामी ज्या इतिहासकारांकडे रायगडशी संबंधित जुन्या वस्तू, पुरावे असतील तर त्यांनी त्या प्राधिकरणाकडे सादर कराव्यात. इतिहासाला उजाळा मिळण्यास त्यामुळे सोपे होईल. त्यामुळे पुरावे द्यावेत, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

प्राधिकरणात पुरातत्त्व खात्यापासून तज्ज्ञांचा समावेश आहे. अमुक एकाच्या मनात आले म्हणून काही होणार नाही, तर प्राधिकरणाच्या कठोर चाचणीनंतरच एकेक गोष्ट पुढे सरकेल. पुरातत्त्व खातेच उत्खनन करेल. नेवासाहून दगड आणण्याचा विचार होता. त्यास आपण विरोध केला. त्यामुळे ५७ टक्के वाहतुकीच्या खर्चात कपात झाली. गडावरील होळीचे मैदान ते बाजारपेठेपर्यंत पाथ वे केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवभक्तांना थांबण्यासाठी बैठक व्यवस्था उभारता येईल का याचा विचार आहे. बैठकव्यवस्था याचा अर्थ लॉन करणार असे नाही. १३ पैकी चार पाण्याच्या टाक्‍यांचे काम प्रत्यक्ष सुरू होत आहे.

एअर पोर्टसारखी स्थिती नको
गड पुनर्बांधणीची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. परवानगी मिळाली की कामास सुरुवात होईल. कोल्हापूरच्या एअर पोर्टसारखी स्थिती नको, असेही संभाजीराजे म्हणाले. उड्डाण योजनेत विमानतळाचा समावेश झाला आहे; मात्र उड्डाणाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

किल्ले सिंधुदुर्गचाही प्राधिकरणात समावेश केला आहे. राजगड, पन्हाळ्याचाही नियोजित मॉडेल फोर्टमध्ये समावेश आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधी द्यावा यासाठी टाटा, कल्याणी उद्योग समूहाच्या मालकांना भेटणार आहे. ज्या शिवछत्रपतींच्या राज्यात चार पैसे मिळविण्याची संधी मिळाली, त्यातील काही रक्कम गडकोट किल्ल्यांवर खर्च करण्यास काय अडचण आहे, असा प्रश्‍नही संभाजीराजे 
यांनी केला.

३२ मण सिंहासनालाही परवानगी घ्यावी लागेल
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ३२ मण सिंहासन कोणी करत असेल, तर ही बाब स्वागतार्ह आहे. यासाठीही प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. संभाजी भिडे यांनी अलीकडेच ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा विडा उचलला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

फॉर्म 17C नुसार मतदानाची आकडेवारी जाहीर केल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होईल; ECI चे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

Shah Rukh Khan Health Update: आता कशी आहे शाहरुखची तब्येत? चुही चावलानं दिली हेल्थ अपडेट

Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला द्या अशा हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आजचे राशिभविष्य - 23 मे 2024

SCROLL FOR NEXT