पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजीत भरदिवसा तरुणाचा पाठलाग करुन खून

राजेंद्र होळकर

इचलकरंजी - येथील शांतीनगरातील कंजारभाट वसाहतीमध्ये एका गंवडी काम करणाऱ्या तरुणावर सशस्र हल्ला करुन खून करण्यात आला. रामा कचरु गरड (रा.जयभीमनगर झोपडपट्टी, इचलकरंजी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामा गरड हा गंवडी काम करत होता. गेल्या काही दिवसापासून त्याचे काम बंद असल्याने घरी होता. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो मोटरसायकल घेवून घरातून बाहेर पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याहून महासत्ता चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडने तो जात होता. याचवेळी मोटरसायकलवरुन हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरु केला. हल्लेखोर पाठलाग करत आहेत हे लक्षात येताच त्याने मोटारसायकल सोडून तो पळत सुटला. पण पळत जाताना शांतीनगरातील कंजारभाट वसाहतमधील चौकात  त्याचा पाय घसरला  व तो खाली पडला. याच दरम्यान तेथे हल्लेखोरांनी त्याच्यावर सशस्र हल्ला करुन त्याचा खून केला. 

या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडल्या घटनेची माहिती घेवून हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पोलिस पथके तयार केली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT