पश्चिम महाराष्ट्र

डोर्ले कॉर्नर ते न्यूजर्सी व्हाया हिरवी सायकल

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - आईने पै-पै करून साठवलेले चारशे रुपये प्रवेश परीक्षेचे शुल्क म्हणून भरले, आणि तेही शेवटच्या दिवशी मुदत संपत असताना. अठरा वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे तसा कॉम्युटरमधला ‘क’सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसणारा. पाचशे ते सहाशे जणांतून अखेर राजेश मांजरेकरची शिवाजी विद्यापीठात ‘एमसीए’साठी निवड झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. परदेशात नोकरीचे आणि स्वतःची ‘बीएमडब्ल्यू’ घेऊन फिरण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. राजेश सुटीसाठी सध्या कोल्हापुरात आला आहे. त्यानिमित्ताने डोर्ले कॉर्नर ते न्यूजर्सी व्हाया हिरव्या रंगाची सायकल असा त्याचा तितकाच रंजक आणि प्रेरणादायक प्रवास पुन्हा त्याच्या मित्रांसह मांजरेकर कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतो आहे. 

वडील नोकरी करून घराचा डोलारा सांभाळत होते. शेंगदाणे आणि खारीडाळीच्या पुड्या तयार करून त्या हॉटेलांना पुरवण्याचा मांजरेकर कुटुंबाचा साईड बिझनेस. सायकल रंगवायलाही दीडशे रुपये नव्हते, म्हणून वडिलांनी शिल्लक असलेल्या हिरव्या रंगाच्या ऑईलपेंटने ती रंगवून दिली आणि याच सायकलवरून शहरातील हॉटेलात खारीडाळ आणि शेंगदाणाच्या पुड्या पोचवताना परदेशातील नोकरी आणि स्वतःची ‘बीएमडब्ल्यू’ घेऊन फिरण्याचे स्वप्न त्याने पाहिले.

अर्थात चौथीला असल्यापासूनच त्याच्या वाट्याला हे काम आलं. करिअर कशात करायचं, हा प्रश्‍न आल्यावर वडील सहजच म्हणाले, ‘‘त्या पोरानं काय केलंय बघ, त्याला लंडनला नोकरी मिळालीय.’ राजेशने मग त्याला गाठला आणि ‘एमसीए’ची माहिती घेऊन जुनी पुस्तके मागून घेतली. मुळात तो वाणिज्य शाखेचा पदवीधर. कारण ‘सीए’ होण्यासाठी त्याने ही शाखा निवडली होती. मग, ‘एमसीए’ आणि ‘सीए’ असा दोन्ही प्रवास सुरू झाला; पण कॉम्प्युटरच्या प्रोग्रामिंगमध्येच तो अधिक रमला. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरात एका ठिकाणी नोकरी करू लागला; पण त्याने घराची आर्थिक परिस्थिती आणि आपली स्वप्ने पूर्ण नाही होऊ शकणार, याची जाणीव त्याला होती. मग मुंबईत एक कंपनी गाठली; पण तिथे परदेशात जाण्याची संधी नव्हती. हैदराबादच्या ‘सत्यम्‌’ची ऑफर असताना मात्र त्याने पुण्यातील कंपनी जॉईन केली. कारण अपेक्षित ध्येय साध्य करण्याची संधी त्याला येथे होती. 

दीडच वर्षांनी त्याला अमेरिकेला जायची संधी मिळाली आणि दोनदा अमेरिकेत जाऊन आल्यानंतर पुढे न्यूयॉर्कमधीलच एक कंपनी त्याने जॉईन केली. इथून मग त्याच्या पुढील स्वप्नांच्या पूर्ततेचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्र हायस्कूल, कॉमर्स कॉलेजमध्ये शिकलो आणि मराठी माध्यमात शिकणारी मुलंही जगाच्या पाठीवरील कुठलेही लक्ष्य साध्य करण्यात कधीच कमी पडत नसल्याचे तो आवर्जून सांगतो.  

कष्ट आई-वडिलांचे...! 
स्वतःच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर पुढे काय होईल, याची खात्री नसल्याने त्याने तत्काळ आई-वडिलांचा व्हिसा मिळवला आणि त्यांना अमेरिकेत बोलावून घेऊन अमेरिकेचे दर्शन घडवले. सध्या तो न्यूजर्सीमध्ये स्थायिक आहे आणि काही लाख डॉलरमध्ये त्याचे वर्षाचे पॅकेज आहे. आई-वडील परिस्थितीमुळे आपल्याला काही देऊ शकत नसले तरी आपण आता त्यांच्यासाठी जे काही शक्‍य आहे, तेवढं करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे लहान भाऊ रणजितने मात्र कोल्हापुरात दुसरा व्यवसाय सुरू केला असला तरी मूळ खारीडाळ-शेंगदाण्याचा व्यवसाय आजही जपला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT