पश्चिम महाराष्ट्र

रेड्याच्या टकरीला मिळाली नवी झळाळी

सुधाकर काशिद

कोल्हापूर -  वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, अजिजुद्दीन खाँ, डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या घराचा पत्ता ‘‘राहणार रेड्याच्या टकरीजवळ’’ असा होता. हे आता पटणारही नाही आणि आता रेड्याच्या टकरीजवळ राहणाऱ्या नव्या पिढीलाही रेड्याची टक्कर माहीत नाही. मात्र, रेड्याची टक्कर ही जुनी ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहावी, यासाठी या परिसरातील अजिंक्‍यतारा मित्रमंडळाने पुढाकार घेतला. रेड्याच्या टकरीचे प्रतीक असलेल्या शिल्पाचे नूतनीकरण केले. मोडलेली शिंगे, हरवलेले तेज अशा अवस्थेत विस्मृतीकडे चाललेल्या शिल्पाला नवी झळाली दिली.

आता कोणी या परिसराला प्रतिभानगर, तोरणानगर, सागर माळ, आयडियल सोसायटी, स्टेट बॅंक कॉलनी म्हणत असेल, जरूर तशी कागदपत्रावर नवी ओळखही असेल; पण रेड्याच्या टकरीचा माळ ही ओळख देखील कायम राहावी, यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. केवळ रेड्याच्या टकरीचा माळच नव्हे, तर कोल्हापुरातील जुनी ओळख दर्शवणाऱ्या ज्या खुणा हरवत चालल्या आहेत, त्याचेही या मंडळातर्फे टप्प्याटप्प्याने पुर्नसंजीवन करण्यात येणार आहे.

नवे बदल स्वीकारताना जुन्या स्मृती त्या बदलाखाली दडल्या जाऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची ही धडपड सुरू आहे. आज प्रतिभानगर, तोरणानगर, आयडियल सोसायटी, स्टेट बॅंक कॉलनी जेथे आहे, तो मूळ सागर माळ. या माळावरचे सागर देवाचे छोटे मंदिर आजही आहे. पूर्वी हा माळ हिरव्या गवताचा. त्यामुळे तेथे कोल्हापुरातील गवळी व्यावसायिक म्हशी चरायला घेऊन जात. या माळावर सागराच्या छोट्या मंदिराशिवाय एक घर नव्हते, तर एक खोपटंही नव्हते. त्यामुळे या माळावर रेड्याच्या टकरीचे आयोजन केले जात होते.

मूळ कोल्हापूर शहराचा विस्तार होऊ लागल्यावर व सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था उभ्या करण्यास मान्यता मिळाल्यानंतर या रेड्याच्या टकरीच्या माळावर एक गृहनिर्माण संस्था उभारण्यास सुरवात झाली. 
या गृहनिर्माण संस्थेत ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, वि. स. खांडेकर, डॉ. सुमती क्षेत्रमाडे, डॉ. कित्तुर, अजिजुद्दीन खाँ, डॉ. श्री. श्री. माळ, बाळासाहेब सबनीस अशी प्रतिभावान मंडळी होती. १९४५-४६ च्या सुमारास प्रतिभानगर या नावाने गृहनिर्माण संस्था स्थापन झाली व एक एक बंगल्याची उभारणी होऊ लागली. प्रतिभानगर असे त्याचे नाव जरूर नोंद झाले; पण प्रतिभानगर कोठे? तर, रेड्याच्या टकरीजवळ असेच सांगत राहावे लागले.

ओळख पुसत गेली
हळूहळू रेड्याची टक्कर, सागर माळ ही ओळख पुसत गेली. आता जी पिढी या परिसरात राहाते, त्यांना सागर माळ, सागर देव, रेड्याची टक्कर याची माहितीही नाही. दरवर्षी पाडव्यानिमित्त शहरातील गवळी व्यावसायिक या माळावर आपल्या म्हशी वाजतगाजत आणतात. त्यामुळे थोडीफार माहिती जिवंत राहिली. नेमकी हीच परिस्थिती ओळखून अजिंक्‍यतारा मित्रमंडळाने रेड्याच्या टकरीला पुन्हा उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT