पश्चिम महाराष्ट्र

रायगडावर यंदा तीन लाखांवर शिवभक्त 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार (ता. 5) पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. सहा जूनला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होईल. 

पाच आणि सहा जूनला सोहळा होणार असला तरी एक जूनपासूनच शिवभक्तांच्या तुकड्या रायगडावर दाखल होणार आहेत. पाच जूनला सकाळी स्वच्छता मोहिम होईल. दुपारपासून मोफत अन्नछत्राला प्रारंभ होईल. दुपारी साडेतीनला खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत होईल आणि त्यानंतर त्यांच्यासह शिवभक्त पायी गड चालण्यास प्रारंभ करतील.

साडेचारला एकवीस गावातील सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडपूजन होईल. सहा वाजता गडावर उत्खननात सापडलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. साडेसहाला मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके तर त्यानंतर शाहिरी कार्यक्रमाला प्रारंभ होईल. रात्री आठ वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती शिवभक्तींशी थेट संवाद साधतील. त्यानंतर गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, किर्तन, "ही रात्र शाहिरांची' हा कार्यक्रम होईल. 

सहा जूनला सकाळी सहा वाजता नगारखाना येथे ध्वजपूजन होईल. त्यानंतर शाहिरी कार्यख्रम होईल. साडेनऊला राजसदरेवर शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन होईल. दहा वाजता खासदार संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन व त्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होईल. मुख्य सोहळ्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन होवून त्यांच्या उपस्थितीत पोलखी सोहळा होईल. दुपारी बारा वाजता सोहळ्याची सांगता होईल. दरम्यान, पत्रकार परिषदेला गणी आजरेकर, अमर पाटील, संजय पोवार, विनायक फाळके, डॉ. मकरंद ऐतवडे, शाहिर विशारद आझाद नायकवडी आदींची उपस्थिती होती. 

सुविधा अशा... 

  • मोफत अन्नछत्रासह नाष्टा व चहा 
  • पाचशे लिटरच्या चाळीस पाण्याच्या टाक्‍या 
  • चार पोलिस निरीक्षक, चाळीस उपनिरीक्षकांसह दोनशे पोलिसांचा बंदोबस्त 
  • व्हाईट आर्मीची आपत्कालीन व्यवस्था 
  • मोबाईल टॉयलेटस्‌, आरोग्य केंद्राचीही सुविधा 

राज्याभिषेक गीत 
1974 साली शाहिरमहर्षी आत्माराम पाटील यांनी लिहिलेले राज्याभिषेक गीत यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल. शाहिर आझाद नायकवडी यांच्यासह शाहिर राजेंद्र कांबळे, सुरेश जाधव, आनंद बागणीकर, रंगराव पाटील हे गीत सादर करतील. 

थेट संवाद 
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने खासदार संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी सोहळ्यात थेट संवाद साधणार आहेत. कुठल्याही प्रकारची शंका त्यांना शिवभक्त थेट विचारू शकतात, असे यावेळी फत्तेसिंह सावंत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT