पश्चिम महाराष्ट्र

भाजप प्रवक्‍त्यावर कारवाईची चर्मकार समाजाची मागणी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - भाजपचा प्रवक्ता केदार खाडीलकर (सांगली) या अकार्यक्षम प्रवक्‍त्याने चर्मकार समाजाला खेटर म्हणून या समाजाचा अवमान केला आहे. या बेजबाबदार प्रवक्‍त्यावर जातिवाचक कायद्याखाली कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मोर्चाव्दारे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिसप्रमुखांना हे निवेदन दिले.

(व्हिडिआे - नितीन जाधव)

निवदेनात म्हटले आहे, जातिवाचक कायद्याखाली भाजप मीडियाचा प्रवक्ता केदार खाडीलकर (सांगली) यास तत्काळ अटक करावी. चर्मकार समाज उपेक्षित, शोषित आणि कष्टकरी असून, या समाजाने जात धर्माच्या नावावर कधीही स्थार्थी राजकारण करून स्वहीत साधले नाही. आमचा चपलांचा पारंपरिक व्यवसाय असून, यामध्ये आम्ही भारतीय संस्कृती व पारंपरिक कला यांचे जिवापाड जतन केले आहे. महापुरुष, महामानव आणि आपली पवित्र भूमी हीच आमची दैवतं आहेत; परंतु या समाजाला खेटर म्हणून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या खाडिलकरचा चर्मकार समाज जाहीर निषेध करत आहे. भाजपच्या या समाजद्रोही नेत्याने या स्वाभिमानी समाजाचीच जाहीर माफी मागावी, अन्यथा राजकारण म्हणजे काय? नेतेगिरी व आंदोलन म्हणजे काय हे दाखवून देण्यात येईल, असा इशारा दिला. नगरसेवक भूपाल शेटे, नगरसेविका वृषाली कदम, दुर्वास कदम, सुखदेव सातपुते, संतोष बिसुरे, अरुण कुराडे, अरुण सातपुते, नामदेव पोवार, रामभाऊ कोरे, राजू मालेकर, नीलेश हंकारे, अजय डोईफोडे, विशाल कदम, सचिन गाडेकर, सुनीता कांबरे, स्वाती नांगरे, स्वाती बिसुरे आदींसह बहुसंख्य संख्येने मोर्चात नागरिक सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT