पश्चिम महाराष्ट्र

विंध्यगिरीला वेढा घालत श्रवणबेळगोळला शोभायात्रा

संजय खूळ

श्रवणबेळगोळ - सोनेरी रथ त्या पाठीमागे चांदीचा रथ, २४ पालख्या, प्रचंड वाद्य वृंद, कर्नाटकसह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे पथनाट्ये  अशा उत्साही वातावरणात आज येथे शोभायात्रा काढण्यात आली.

संपूर्ण विंध्यगिरी पर्वताला वेढा घालणारी भव्य मिरवणूक लक्षवेधी अशी ठरली. दरम्यान २१ व्या शतकातील दुसरा भव्य महामस्तकाभिषेक सोहळा उद्या (शनिवारी) होत असून देश विदेशातील लाखो भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत. 

दर बारा वर्षांनी होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होतात. यामध्ये आज भव्य शोभा यात्रा झाली. या मिरवणुकीची सुरुवात श्रवणबेळगोळपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या यात्रीनगर पासून झाली. शोभा यात्रेच्या अग्रभागी सुवर्ण रथ होता. हा रथ या महोत्सवाच्या निम्मिताने समर्पित करण्यात आला. त्या पाठोपाठ २००६ मध्ये झालेल्या महामस्तकाभिषेक वेळी देण्यात आलेला चांदीचा रथ होता. अत्यंत उत्कृष्टरित्या सजविण्यात आलेल्या २४  पालखीत २४ तीर्थकराच्या मुर्ती होत्या.

विविध वाद्यपथके, देशाची संस्कृतीची ओळख करून देणारी अनेक पथनाट्ये ,विविध संदेश देणारे प्रबोधनपर देखावे लक्षवेधी ठरत होते. अनेक पारंपरिक वाद्ये, दुर्मिळ होत चाललेल्या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण यामध्ये केले होते.  संपूर्ण विंध्यगिरी पर्वताला वेढा घालणारी भव्य मिरवणूकीचा सोहळा पाहण्यालासाठी रस्त्याच्या दुतर्फ़ा प्रचंड गर्दी झाली होती. विंध्यगिरी पायथ्याशी ही मिरवणूकीचा शेवट झाला. 

दरम्यान, २१ व्या शतकातील दुसरा महामस्तकाभिषेक सोहळ्यास उद्यापासून (शनिवारपासून) सुरुवात होईल. सकाळपासून विविध धार्मिक विधी होतील, त्यानंतर दुपारी दोन वाजता महामस्तकाभिषेक सोहळ्याला प्रारंभ होईल. प्रथम १०८ कलशाचा अभिषेक आणि त्यानंतर पंचामृत अभिषेक होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT