पश्चिम महाराष्ट्र

शाहुवाडी तालुक्यात अपघातात पुण्याचे सहाजण ठार

नितीन जाधव

कोल्हापूर -  रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील तळवडे येथे मोटार (एमएच ११ एडब्लू ६६०० ) झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये सहाजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. 

हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाला. मोटारीत एकूण आठजण होते. हे सर्वजण गणपतीपुळे येथे जात होते. तळवडे गावाजवळ एका झाडावर त्यांची मोटार आदळली. अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले तर मोटार चालकाचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

मृतांची नावे अशी  

प्रशांत सदाशिव पाटणकर, मोटार चालक  (वय - ४० रा. भागीरथी हाऊस, पिंपळे गुरव ,पुणे ),  संतोष त्रिंबक राऊत (वय - ३७), स्नेहल संतोष राऊत (वय - ३२), स्वानंद संतोष राऊत (वय - ५ ) हे सर्व रा.शेवाळेवाडी ,हडपसर, पुणे तर  दीपक बुधाजी शेळकंदे (वय ४०,  रा . ८४/१/२ साई पार्क लक्ष्मीसुपर मार्केट समोर दिघी पुणे ),  प्रणव दीपक शेळकंदे (वय ३)

या अपघातामध्ये वरूणा दीपक शेळकंदे (वय - ४०), यदन्या दीपक शेळकंदे (वय - ३) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

SSC Result: दहावीच्या निकालाचीच ‘परीक्षा’; राज्य मंडळाला मिळेना मुहूर्त, ‘सीबीएसई’पेक्षा विद्यार्थी कमी असूनही विलंब!

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

SCROLL FOR NEXT