पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या प्रदेश सरचिटणीपदी आमदार सुरेश हाळवणकर  

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - येथील आमदार सुरेश हाळवणकर यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे - पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. निवडीचे पत्र आमदार हाळवणकर यांना ई-मेलव्दारे प्राप्त झाले आहे. त्यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून श्री.हाळवणकर पक्षाचे काम करीत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. युवा मोर्चाबरोबरच पक्षाचे शहराध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. नगरसेवक, उपनगराध्यक्ष पदावरही त्यांनी काम केले आहे. भाजपचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्षपद ही त्यांनी दोनवेळा सक्षमपणे सांभाळले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे विधानसभेतील ते पहिले आमदार आहेत. सध्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विविध स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामध्ये आमदार हाळवणकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पक्षाच्या प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT