पश्चिम महाराष्ट्र

बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना अटक

नितीन जाधव

कोल्हापूर - बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारात आणण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. विश्‍वास आण्णापा कोळी (वय 27 रा. आलास, ता. शिरोळ) व जमीर अब्दुलकादर पटेल ( वय 32, रा. बीगी कनवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरोळ व कुरूंदवाड परिसरात 2000, 200 व 100 रुपयांच्या बनावट नोटा व्यवहारात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संजय मोहिते व अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना ही माहिती दिली व याचा तपास करण्यास सांगितले. या करिता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पथक तयार केले. दरम्यान विजय केरबा कारंडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात बनावट नोटाबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विश्‍वास कोळी व जमीर पटेल या दोघांना वळीवडे रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर विश्‍वास याने आपणच बनावट नोटा करत असल्याची कबूली दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन हजार रुपयांच्या 75 नोटा, 200 रुपयांच्या 177 नोटा व 100 रुपयांच्या 638 नोटा अशी दिड लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्यांच्याकडील रंगीत प्रिंटर, बॉन्ड पेपर व कात्रीही जप्त करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

SCROLL FOR NEXT