पश्चिम महाराष्ट्र

मलेशियात अडकले परराज्यांतीलही तरुण

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - हॉटेलमध्ये नोकरी लावतो असे सांगून तरुणांना फसविणारा सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ पवारचे रॅकेट देशपातळीवर असल्याची माहिती पुढे येत आहे; मात्र अद्यापही तो मोकाटच आहे. 

महाष्ट्रासह पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा, हैदराबाद, पश्‍चिम बंगाल, तमीळनाडूचे तरुण आज मलेशियातील भारतीय वकिलातीत आल्याचे समजते. पवारने पाठविलेले 

महाराष्ट्रातील चार तरुण मलेशियात तुरुंगात आहेत, तर पाच तरुणांना एजंटांनी फसवून त्यांच्याकडून पासपोर्ट काढून घेतला आहे. ते भारतीय दूतावासात दाखल झाले आहेत. 

देशातील तरुणांना हेरायचे आणि त्यांना नोकरीच्या आमिषाने मलेशियात पाठविण्याचे काम केले जाते. त्यासाठी प्रत्येक तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले जातात. एकदा ते मलेशियात गेले की, त्यांच्याकडून पासपोर्ट आणि तात्पुरता दिलेला व्हिसा (खरा की खोटा) काढून घेतला जातो. त्यानंतर काही तरुणांना तेथील हॉटेलमध्ये कामाला लावले जाते. रूम साफसफाई करण्यासह इतर कामे लावली जातात. सध्या मलेशियात फसलेल्या अनेक तरुणांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तरीही त्यांना साफसफाईची कामे लावली जात आहेत. कोल्हापूरसह पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नगरमधीलच नव्हे तर परराज्यातील तरुणांचीही अशीच अवस्था झालेली आहे. अटक झालेले चार आणि वकिलातीत शरण आलेल्या पाच तरुणांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र इतर राज्यांतील तरुणांची अवस्था बिकट बनली आहे. पासपोर्ट एजंटांकडे असल्याने ते हॉटेलमधून बाहेर पडू शकत नाहीत.
जोपर्यंत सांगलीतील एजंट कौस्तुभ पवारला अटक होऊन त्याची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत या रॅकेटचा सविस्तर उलगडा होणे कठीण आहे. फिर्याद घेण्यासाठी पोलिसांनी चार दिवस खर्ची घालवले. पवारला अभय दिले जात असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. त्याला अटक झाल्यास अनेक धागेदोरे उघड होणार आहेत.
 

कौस्तुभ पवारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षेसाठी नवीन कायद्याप्रमाणे गुन्ह्याची सखोल चौकशी करून त्याला अटक करावी लागणार आहे. या गुन्ह्यातील तपासात मी स्वतः लक्ष घातले आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल. त्यासाठी चौकशी पूर्ण होणे आवश्‍यक आहे, ती सुरू आहे.
सुहेल शर्मा, पोलिस अधीक्षक, सांगली

न्यायालयीन खर्चाचा हिस्सा भारत उचलेल - ज्ञानेश्‍‍वर मुळे
मलेशियातील तुरुंगात असलेल्या मराठी तरुणांना सोडविण्यासाठी खासगी वकील देण्याची तयारी नातेवाईकांनी दाखविली. ‘सकाळ’मधील आजची बातमी वाचून परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज पुन्हा मलेशियातील हाय-कमिशनला विनंती केली आणि त्यांनी सरकारी वकिलांच्या दराप्रमाणे मदतीची ग्वाही दिली आहे.

नोकरीसाठी मलेशियात गेल्यावर एजंटांनी फसवणूक केल्यामुळे तुरुंगात अडकलेल्या चार मराठी तरुणांना मायदेशी आणण्यासाठी मलेशियात असलेले कागलचे प्रवीण नाईक यांनी स्वतः वकील देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी वकिलांशी चर्चा केली असून चारही तरुणांना सोडविण्यासाठी आवश्‍यक ॲडव्हान्सही दिला आहे. न्यायालयीन खर्च मोठा असल्यामुळे तो खर्च एकट्या व्यक्तीला परवडणारा नसल्याचे दिसून येत आहे. याबाबतची बातमी आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज पुन्हा एकदा मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तेथून न्यायालयीन प्रक्रियेसाठी सरकारी दराप्रमाणे जी आर्थिक मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही रक्कम भारतीय दूतावास देईल, असा विश्‍वास सचिव मुळे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.

‘‘दरम्यान सरकारी खर्च नियमातून करण्यावर मर्यादा येत आहेत. आवश्‍यक असल्यास मी स्वतः माझ्याकडून वैयक्तिक खर्च करण्यास तयार आहे. आपण सर्वजण मिळून हा खर्च करून सर्व तरुणांना मायदेशी परत आणू,’’ असे मुळे म्हणाले. सध्या अटकेत असलेले चार आणि वकिलातीमधील पाच तरुणांना महाराष्ट्रात आणण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. त्याचीही व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रक्रिया लवकरच पूर्ण - मुळे
‘‘मलेशियात कोल्हापूरसह महाराष्ट्रातील जे पाच तरुण भारतीय वकिलातीत दाखल झाले आहेत, त्यांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेथील अधिकारी स्थानिक न्यायालयीन बाबींची पूर्तता करीत असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल,’’ असा विश्‍वास परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दै ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

संबंधीत बातम्या..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT