Almatti Dam Karnataka esakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : आलमट्टीतून विसर्ग कमी केल्याने पूर ओसरण्यास विलंब लागण्याची शक्यता; कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका कायम?

Almatti Dam Karnataka : महाराष्ट्रातील जलाशयांतून व पावसाचे येणारे पाणी याचा विचार करून गेल्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

दोन आठवड्यांपूर्वीच पावसाचे वाहून येणारे पाणी साठवून आलमट्टी जलाशय शंभर टीएमसीपर्यंत भरून घेण्यात आले होते.

चिक्कोडी : पाऊस ओसरल्याने दिलासा मिळाला असला तरी या भागातील पूरस्थिती ओसरण्याकडे लक्ष लागलेले असतानाच आलमट्टी (Almatti Dam) जलाशयातून सोमवारी सकाळीच विसर्ग कमी करण्यात आला आहे. सव्वा तीन लाख क्युसेक असलेला विसर्ग आता तीन लाख क्युसेक केला आहे. विशेष म्हणजे रविवारच्या तुलनेत सोमवारी आवक अधिक असतानाही आलमट्टीतून विसर्ग कमी केल्याने पूर ओसरण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील जलाशयांतून व पावसाचे येणारे पाणी याचा विचार करून गेल्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर, सांगली (Kolhapur, Sangli Flood), चिक्कोडी भागाला दिलासा मिळाला होता. दोन दिवस पाऊस कमी झाला असला तरी धरण क्षेत्रातील वाहून येणारे पाणी कायम आहे. तरीही सोमवारी आलमट्टीतून विसर्ग कमी केला आहे. शनिवारी २ लाख ४० हजारांपर्यंत आवक होती. तेव्हा रात्री सव्वा तीन लाख विसर्ग केला होता.

रविवारी संध्याकाळी २ लाख ६८ हजार इतकी आवक असतानाही विसर्ग सव्वा तीन लाख क्युसेक इतकाच होता. पाऊस थांबला असला तरी धरणांतून आलेले पाणी विविध नद्यांतून वाहून येण्यास विलंब होऊन हे पाणी आलमट्टीला जात आहे. सोमवारी हे सर्व पाणी मिळून आलमट्टीत तीन लाख क्युसेक पाणी वाहून येत होते. तरीही विसर्ग कमी करून तीन लाख केला आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आलमट्टीतील आवक आणि विसर्ग तीन लाख क्युसेकवर ठेवला आहे. त्यामुळे पुराचे पाणी गतीने कमी होण्यावर मर्यादा येणार असल्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच पावसाचे वाहून येणारे पाणी साठवून आलमट्टी जलाशय शंभर टीएमसीपर्यंत भरून घेण्यात आले होते. त्यानंतर संततधार पाऊस, महाराष्ट्रातील धरणांतून विसर्ग आणि कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागाला आलेला पूर ओसरण्यासाठी आलमट्टीतून विसर्ग वाढविला होता. पण, सध्या विसर्ग लागलीच कमी केला आहे. शनिवारी ७४ टीएमसीपर्यंत असलेला पाणीसाठा रविवारी ६९.६४ टीएमसी इतका झाला होता. दोन दिवस आवकेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने सोमवारी ६७.८५ टीएमसी (५५.१३) पाणीसाठा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT