Kolhapur Why Airline Night Landing Cancelled Kolhapur Marthi News 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात का अडकले ‘नाईट लँडिंग’..?

लुमाकांत नलवङे

कोल्हापूर :जीपीएस’चे लोकेशन अद्याप महापारेषण कंपनीला न मिळाल्याने विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ लटकले आहे. सध्या असलेल्या विमानसेवेत आणखी काही ‘लोकेशन’ वाढणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून (एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडिया-एएआय) सध्या ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाईट लँडिंग पूर्ण होऊ शकले नाही. नवीन जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) लोकेशन मिळताच आठवड्यात काम पूर्ण करण्याची तयारी महापारेषण कंपनीने दाखवली आहे. नाईट लँडिंग पूर्ण झाल्यास रात्रीही विमानसेवा सुरू होऊ शकते


कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यास आणखी विमानांचे ‘टेक ऑफ’ येथून होणार आहे, मात्र तब्बल पाच वर्षे पूर्ण झाली, याबाबत केवळ चर्चाच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही विमानळावर येण्यासाठी हवामानाचा अंदाज घ्यावा लागला. या वेळी नाईट लँडिंगच्या सुविधेबाबत काय झाले? असा प्रश्‍न पुढे आला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा पाठपुरावा केला.
हेही वाचा - सांगलीतील महापुर पोहचला जपानमध्ये  

महापारेषण कंपनी अडकलेले काम पूर्ण करणार

तेव्हा साधारण १२ लाख ५० हजार ते १४ लाख रुपये खर्च असल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून पूर्वी ठरलेले १२ लाख ७० हजार आणि आणि त्यात वाढ झाल्याने एकूण १४ लाख ८० हजार रुपये जिल्हा नियोजन विभागातून महापारेषाण कंपनीला दिले. यानंतर तीन महिने उलटले तरीही नाईट लॅण्डिंगचे काम पूर्ण झाले नाही.दरम्यान, नाईट लँडिंगसाठी आवश्‍यक सर्व रक्कम मिळाल्यानंतर ‘महापारेषण’ने याचे टेंडर प्रसिद्ध केले
या वेळी नाईट लँडिंगसाठी आवश्‍यक ४० लोकेशन विमानतळ 
प्राधिकरणाकडून दिले होते

निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे काम ही संबंधित ठेकेदाराला आदा केले, मात्र या परिसराचा सर्व्हे केल्यानंतर यात काही लोकेशन कमी-जादा होऊ लागले. तरीही संबंधित ठेकेदाराकडून काम करून घेण्याची तयारी महापारेषणने घेतली मात्र जोपर्यंत जीपीएस लोकेशन मिळत नाही, तोपर्यंत हे काम करणे अशक्‍य असल्यामुळे नाईट लॅण्डिंग अडले आहे.

जीपीएस म्हणजे काय?
अंतराळातल्या उपग्रहांच्या सहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातील बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ही पद्धत शोधली आहे. तिला जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) असे म्हटले जाते. जागतिक स्थिती प्रणाली विकसित करण्यात आली होती; पण तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला आहे.

आठवड्याभरात  काम पूर्णत्वाकडे

कोल्हापूर विमानतळावर ‘नाईट लँडिंग’साठी ठेका दिला आहे. आठवड्यात हे काम पूर्ण होऊ शकते. मात्र, भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे आणखी काही ‘जीपीएस लोकेशन’ वाढविण्यात येणार आहे. तोपर्यंत हे काम ‘जैसे थे’ ठेवण्याबाबतचा पत्रव्यवहार केला. जोपर्यंत नवीन जीपीएस लोकेशन मिळत नाही, तोपर्यंत काम पूर्ण करणे शक्‍य नाही. सर्व रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मिळालेली आहे
- . सी. धमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT