Kolhapur Youth Gamblers Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

 कोल्हापूरातील तरुण का चालले या वाटेने...?

सुधाकर काशिद

कोल्हापूर : तरुणांच्यात वावरून तरुणांनाच वाईट मार्गाला नेणारी कोल्हापुरात एक टोळी आहे. वरवर तालमीचा कार्यकर्ता, व्यापार व्यवसायांतील कार्यकर्ता, पेठेतला कार्यकर्ता असा त्यांचा चेहरा आहे; पण प्रत्यक्षात कोल्हापुरातील तरुणांना व्याजाने पैसे पुरवून त्यांना जुगाराच्या व्यसनात गुरफटण्यात या ठराविकांचा मोठा वाटा आहे. 

इथल्या तरुणांना फुकट गोव्याला न्यायचे, त्यांची चैन पुरवायची व त्यांना व्याजाने पैसे देऊन समुद्रातील जुगारात बुडवून टाकायचे, हाच त्यांचा धंदा आहे; पण हीच टोळी कोल्हापुरातील सराफ  बाजारात, बुधवार पेठेत, शिवाजी पेठेत रुबाबात वावरते, हे कोल्हापूरच्या तरुणाईच्यादृष्टीने गंभीर आहे.कोल्हापुरातल्या जाणकार, ज्येष्ठ लोकांनीच या टोळीला त्यांच्या छुप्या धंद्याची जाणीव करून देऊन रोखण्याची गरज आहे. जुगारात कधीच कोण कायम जिंकत नाही.


 तरुणांना गोव्याची भुरऴ 
जुगाराचे व्यसन असलेले बहुतेकजण आयुष्यातून उठलेले आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची, वडिलार्जित व्यवसायाची धूळधाण केली आहे आणि कोल्हापुरात असे जुगार अड्डे चालवून लोकांच्या आयुष्याची धूळधाण करून ठराविक जण कोट्यधीश झाले आहेत. आता त्यापुढे जाऊन काही ठराविक जण कोल्हापुरातून तरुणांना गोव्यात खास जुगार खेळण्यासाठी नेत आहेत. त्यांना जुगारातच गुरफटून टाकून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत. जुगार खेळायला पैसे नाहीत तर व्याजाने पैसे द्यायची त्यांनी लगेच सोय केली आहे. हे ठराविक जण कोणताही ठोस कामधंदा न करता रुबाब कसा करतात, गळ्यात सोन्याच्या साखळ्या कशा घालतात.

याचा खोलवर जाऊन कोल्हापूरकरांनी विचार करण्याची गरज आहे.गुजरी परिसरातल्या काही जणांचा सोन्या-चांदीशी खूप कमी संपर्क आहे. त्यांना सोन्याच्या चेनची एक कडी जोडता येत नाही; पण त्यांच्या जुगाराच्या व्यवहारात मध्यस्थी करतात. जुगार खेळणाऱ्याला व्याजाने पैसे देण्यासाठी आपला शब्द टाकतात. स्थानिक भाषेत सांगायचे झाले तर ते ‘झोंबडी’ मिटवण्याच्या सुपाऱ्या घेतात. यांनीच समुद्रातल्या जुगाराचे व्यसन कोल्हापुरातल्या नव्या पिढीला लावले आहे. हा एका दुसऱ्या तरुणाचा किंवा एका दुसऱ्या कुटुंबाचा प्रश्‍न न समजता कोल्हापुरातल्या तरुणांच्या भवितव्याचा प्रश्‍न म्हणूनच याकडे पाहण्याची गरज आहे. 

ठराविक जण सामाजिक कार्यातही
जुना बुधवार पेठेतला एक कार्यकर्ता म्हणून वावरणारा सध्या या समुद्रातील जुगारात आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तो तरुणांना व्याजाने पैसे द्यायची व्यवस्था करतो व जुगारात त्यांना गुंतवून ठेवतो. हे काळे कृत्य करून पुन्हा समाजात कार्यकर्ता म्हणून पुढे पुढेही करतो. असेच काही ठराविक जण कोल्हापुरातल्या सामाजिक कार्यातही मुद्दाम पुढे पुढे असतात व आपला काळा धंदा लपवण्याचा प्रयत्न करतात. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT