MP Sambhaji Raje Chhatrapati birthday special story kolhapur news
MP Sambhaji Raje Chhatrapati birthday special story kolhapur news 
कोल्हापूर

दुर्गराज रायगडला पुनर्वैभव देण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी झगडणारे संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  करवीर छत्रपती घराण्याचा लोककल्याण व जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे आणि रायगड विकासासह महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धनाचा ध्यास घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज (ता. ११) पन्नासावा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीविषयी...

संभाजीराजे यांचा जन्म १९७१ मध्ये बंगळूर येथे झाला. राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. एमबीए असलेले संभाजीराजे गडकिल्ल्यांमध्ये रमतात. क्रिकेट, फुटबॉल खेळणे, पोहणे, घोडेस्वारी, छायाचित्रणासह वाचनाचा छंद त्यांनी जपला आहे. दुर्गराज रायगडला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी ते अखंड काम करत आहेत. यामध्ये शास्त्रीय पध्दतीने उत्खनन, वास्तू जतन, गडाचे ऐतिहासिक महत्त्व, दुर्गमहत्त्व अबाधित राखून पर्यटनाच्या दृष्टीने गडविकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर ठेवण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यातूनच  किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना केली.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या वाटेवरून ते मार्गक्रमण करत आहेत. ‘सह्याद्री प्रतिष्ठान’, ’अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती’ या संस्थांचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच रायगडावर प्रतिवर्षी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. त्यांच्या प्रयत्नांतूनच राजसदरेवर मेघडंबरीत शिवछत्रपतींची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली. खासदार बनल्यानंतर त्यांनी राजधानी दिल्लीतही शिवजयंती साजरी करणे सुरू केले. संसद भवनात राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम सुरू केला. छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र सर्वदूर पोहचवण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, आमदार, विविध देशांच्या राजदूतांना ते आवर्जून शिवछत्रपती आणि राजर्षी शाहूंच्या जीवनावरील ग्रंथ भेट देतात.

कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे ते पेट्रन आहेत. त्यांच्या खासदार निधीमधून ‘मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम’वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ बसवण्यात येणार आहे. शिवाजी पुलाचे काम मार्गी लावण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विमानतळ आधुनिकीकरण, नव्या विमानसेवा, विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ‘शिव-शाहू मंच ट्रस्ट’ व ‘छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरू असतात. मराठा आरक्षणासाठी त्यांनी रस्त्यावरील लढाईसोबतच संसदेत सातत्याने आवाज उठवत या लढ्याचे नेतृत्व केले आहे. महापुरावेळी त्यांनी अनेक संसार उभे केले. निष्कलंक, चारित्र्यवान, कृतिशील व अभ्यासू संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT