1 Crore Work Was Done In Ajra Taluka Through Shramdan Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा तालुक्‍यात श्रमदानातून 1 कोटींचे काम

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यातील विविध गावात 66 पाणंदी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या. सुमारे 75 किलोमीटरचा रस्ते तयार करण्यात आले. प्रशासनाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविली. श्रमदानातून सुमारे एक कोटी रुपयांचे काम झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले असून एक प्रकारे आदर्श तयार केला आहे. 

पाणंदीमधील अतिक्रमणे काढून शेतीकडे जाण्यासाठी रस्ते तयार करावेत, शेतीमाल थेट बाजारपेठेत जावा यासाठी महसुल प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. ग्रामस्थांनी श्रमदान करून अडचणीच्या ठिकाणी जेसीबी यंत्राचा वापर करून पाणंदी खुल्या केल्या. अनेक गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पाणंदी खुल्या झाल्या. 

मुंगुसवाडी, हाजगोळी खुर्द, सुलगाव, मडिलगे, सोहाळे, हात्तीवडे, मुरुडे, आजरा, कर्पेवाडी, सावरवाडी, आजरा, होनेवाडी, हाजगोळी खुर्द, सुलगाव, आवंडी, कर्पेवाडी खालसा, मुमेवाडी, मासेवाडी, भादवण, भादवणवाडी, झुलपेवाडी, उत्तूर, कर्पेवाडी दुमाला, वझरे, धामणे, बहिरेवाडी, हरपवडे, विनायकवाडी, पेरणोली, घाटकरवाडी, सुळेरान, साळगाव, कुरकुंदे, आवंडी, पारपोली, हाळोली, देवर्डे, शेळप, मोरेवाडी, यमेंकोंड, चितळे, हांदेवाडी, कोळींद्रे, चाफवडे, सरंबळवाडी, वाटंगी, यमेकोंड, मलिग्रे, पोश्रातवाडी, गजरगाव, किणे, लाकुडवाडी या गावातील पाणंदी खुल्या केल्या आहेत. काही गावात चार तर काही गावात दोन पाणंदी खुल्या करण्यात आल्या. तालुक्‍यात एकुण 66 पाणंदी खुल्या झाल्या आहेत. 

प्रशासनाला उत्तम सहकार्य 
अनेक गावांत ग्रामस्थांनी पुढाकार घेत पाणंदी खुल्या केल्या. प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य केले. हा एक आदर्श पायंडा असून तालुक्‍यात सुमारे 100 पाणंदी खुल्या करण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी, भुदरगड-आजरा 

शेती उत्पादने विक्रीसाठी मदत 
पाणंदी खुल्या करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत आहेत. शेतातील उत्पादने थेट रस्त्यावर आणता येणार आहेत. बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याकरीता चांगली मदत होणार आहे. 
- विकास अहिर, तहसीलदार, आजरा 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT