कोल्हापूर

सात दिवसात 1 हजार 923 कोरोना बाधित 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सात दिवसांत लॉकडाउन पुकारला. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला, याच लॉकडाउन काळात जिल्हाभरात 1 हजार 923 कोरोना पॉझिटिव्ह आले. तर 59 व्यक्तींचा मृत्यू झाला. अशा स्थितीत घराघरांत, गल्लीबोळात कोरोनाची भीती वाढली आहे.

सात दिवसांत कोरोना बाधा अचानक कशी वाढली? याचे आर्श्‍चय व्यक्त होत आहे. कोरोनाबाधित झालेल्यात 95 टक्के व्यक्ती स्थानीक आहेत. त्यामुळे समूह संसर्ग जाहीर करण्याची वेळ आली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह सापडला, त्यानंतर आठवड्याला दहा ते वीस कोरोनाबाधित सापडत होते. 

15 जूनपर्यंत जवळपास 120 बाधितांवर उपचार सुरू होते. त्यातील उपचाराने बरे होणाऱ्याचे प्रमाणही जास्त होते. 10 जुलैपर्यंत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे सीपीआर रुग्णालयात 35 कोरोनाबाधित उपचार घेण्यासाठी शिल्लक राहिले होते. याकाळात लॉकडाउन शिथिल होते. बाहेरगावावरून येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. 15 जुलैनंतर दिवसाला 40 ते 50 कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले. 
पुढे पाच दिवसही संख्या शंभराच्या जवळपास पोहचू लागली. जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाउन केला मात्र याच काळात दिवसाला दीडशेंवर कोरोनाबाधित आढळू लागले. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. यातही पहिल्या टप्प्यात जे मुंबई, पुणे, सोलापुरातून कोल्हापुरात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे कोल्हापुरात समूह ससंर्ग झाल्याची शक्‍यता वर्तविली गेली. तरी प्रशासनाने समूह संपर्क जाहीर केलेला नाही. 

नाव कोरोनाचे, लक्षण अन्य आजाराचे 
सात दिवसांत 59 व्यक्‍तीचे मृत्यू झाले. या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह जरूर होत्या, मात्र बहुतेकजणांना अन्य गंभीर आजार होते. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुस विकार, कर्करोग या पैकी किमान एक दोन आजारांची तीव्र लक्षणे होती. यात 45 ते 55 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची संख्या 10 आहे तर उर्वरित सर्व व्यक्तीचे वय 55 पेक्षा अधिक आहे. फक्त मृत्यू झाले तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह होते. 

सात दिवासांतील बाधित असे : कंसात मृत्यू 
*सोमवार 135 (7) 
*मंगळवार 216 (5) 
*बुधवार 279 ( 7) 
*गुरूवार 245 (10) 
*शुक्रवार 251 (8) 
*शनिवार 342 (11) 
*रविवार 455 (11) 
----------------------------- 
एकूण कोरोना बाधित 1 हजार 923 ः (मृत्यू 59) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT