कोल्हापूर

कोल्हापुरात 10 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण; प्रभारी जिल्हाधिकारी बलकवडे

60 वर्षापुढील 78 टक्के नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्याला (kolhapur district) 18 वर्षापुढील 31 लाख 26 हजार 917 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सुमारे 10 लाख 77 हजार 680 नागरिकांच्या पहिल्या डोसचे तर 3 लाख 94 हजार 280 नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण (covid-19 vaccine) झाल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी दिली. जिल्हा कार्यबल गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणाल्या, 60 वर्षापुढील 78 टक्के नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. हे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी 44 टक्के इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राप्त होणाऱ्या एकूण लसींपैकी 90 टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येईल अशी स्पष्टता त्यांनी यावेळी केले.

या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, बालरोग तज्ज्ञ डॉ. संगिता कुंभोजकर, डॉ. फारुक देसाई, डॉ. अमोल माने, मनपा आरोग्य आधिकारी डॉ. पावरा, डॉ. सुहासिनी कडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment Success : जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं! सोलापूरच्या ग्रामीण भागातील लेक बनली पोलिस; गरिबीतल्या संघर्षाची ही गोष्ट वाचून डोळे पाणावतील

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये अंबप रोडवर भीषण आग; शेती आणि झाडांना मोठा फटका

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

SCROLL FOR NEXT