10 ton tinkle sale for today one day in belgaum it's beneficial for farmers also 
कोल्हापूर

शेतकऱ्यांना दिलासा ; एकाच दिवसात दहा टन झेंडुच्या फुलांची विक्री

मिलिंद देसाई

बेळगाव : वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळी सणामध्ये झेंडुच्या फुलांना मोठ्‌या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे गेल्या दोन दिवसात झेंडुच्या फुलांची मोठ्‌या प्रमाणात खरेदी झाली असुन शनिवारी शहरात दहा टन फुलांची विक्री झाली आहे. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्या दिवशीही मोठ्‌या प्रमाणात फुलांची विक्री होईल अशी अपेक्षा विक्रेत्यांमधुन व्यक्‍त होत आहे. 

दिवाळी जवळ येताच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढले असुन किरकोळ बाजारात किमान लाल व पिवळ्या रंगाचे झेंडु 80 ते 140 रुपये किलो दराने विक्री होते आहे. तर पांढऱ्या रंगाच्या झेंडुच्या फुलांचे दर 120 ते 200 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. काही प्रमाणात दिवाळीत पूजेसह घराला तोरण बांधणे सजावट करणे, वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. म्हणून प्रत्येकजण त्या प्रमाणे झेंडुच्या फुलांची खरेदी करतात. 

त्यामुळे दिवाळीत इतर सणांपेक्षा झेंडुच्या फुलांची मागणी जास्त असते. फुल उत्पादक, शेतकरी दिवाळी सणाची वाट पहात असतात. मात्र यावर्षी काही दिवसांपुर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्‍यता व्यक्‍त होत होती. परंतु दिवाळीत फुलांना चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळपासुनच गणपत गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेससह इतर भागातील फुल विक्रेत्यांकडे गर्दी पहावयास मिळत होती. 

"नरक चतुर्थी व लक्ष्मी पुजन एकाच दिवशी आल्यामुळे एकाच दिवसात विक्रमी दहा टन फुलांची विक्री झाली आहे. सुभाष मार्केट येथील फुल मार्केट येथेही दिवसभर फुलांच्या खरेदीसाठी नागरीक येत येत होते. दोन दिवसात झेंडुच्या फुलांची मागणी वाढली असुन चांगल्या प्रतीच्या झेंडुना 100 ते 200 पर्यंत दर मिळाला आहे. अजुन दोन दिवस फुलांची मागणी कायम राहील अशी अपेक्षा असुन इतर सणापेक्षा दिवाळीत फुलांना अधिक मागणी असते." 

- सकरपनी गौडर, घाऊक फुल विक्रेता


संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'तो' मुंबईला येतोय, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्...; अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला अटक

Humanoid Robot 100m Record : चिनी रोबोटने मोडला उसैन बोल्टचा जागतिक विक्रम; १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत केले पार, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये आज रास्ता रोको

Nagpur Hawkers Zone: रस्ते-फुटपाथ अतिक्रमणमुक्तीसाठी हॉकर्स झोनचा पर्याय; १२०० परवानाधारक व्हेंडर, ५३ फेरीवाला प्रक्षेत्रे अधिसूचित, तरी प्रमुख रस्त्यांवर व्यवसाय

SCROLL FOR NEXT