10000 employment available in kolhapur with the help of electronics park in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्कसाठी ग्रीन सिग्नल ; १० हजार रोजगार संधी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : हार्डवेअर व सॉफ्टवेअरसह आयटीचे क्‍लस्टर असणाऱ्या ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्क’मधून पाच ते दहा हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पार्कसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यावर केंद्र, राज्य सरकार व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या सहकार्यातून त्याचा डोलारा उभारला जाईल. परिणामी, कोल्हापूर जिल्ह्यात तो व्हावा, यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

पार्कसाठी २०० एकर जागा आवश्‍यक आहे. केंद्र सरकार १४० कोटी रुपये अनुदान देणार आहे, राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यायची आहे. वेस्टर्न चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज हार्डवेअर अॅण्ड सॉफ्टवेअर कंपन्यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी पेलणार आहे. रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, उत्पादन, डिझाईनचे काम पार्कमध्ये सुरू राहील. मात्र, लीड इलेक्‍ट्रॉनिक कंपनीने ३०० कोटींची गुंतवणूक करणे जरुरीचे आहे. संबंधित कंपनीला २०० एकरपैकी २५ ते ३० एकर जागा द्यावी लागेल. त्या जागेवर कंपनीला प्रोजेक्‍ट सुरू करता येणार आहे.

राज्य सरकारने जागा उपलब्ध केल्यानंतर पार्कमध्ये रस्ते, ड्रेनेज सुविधा उपलब्ध होईल. कॉमन फॅसिलिटेशन सेंटरकरिता ७५ कोटी रुपये अनुदान मिळणार असून, पार्कमध्येच ते साकारले जाणार आहे. स्पेअर पार्टपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची निर्मिती करणाऱ्या छोट्या कंपन्यांना इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंडस्ट्रियल शेड तयार केले जाईल. त्यात दोनशे कंपन्या येणे अपेक्षित आहे. आयटी कंपन्यांसाठी २० टक्के जागा पार्कमध्ये असेल. केंद्र, राज्य व चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजची संयुक्त कंपनी अस्तित्वात येणार आहे.

जिल्ह्यातील स्थिती अशी : 


- इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपन्या - ३२ 
- विमानतळाची उपलब्धता  
- मुबलक कुशल मनुष्यबळ 
- शिरोली, वडगाव- तासगाव, कागल 
- फाईव्ह स्टारसह अन्य जागांचा शोध


पार्कमधून काय होणार..? 

- तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
- पाच ते दहा हजार रोजगार उपलब्ध
- टुरिझम इंडस्ट्री डेव्हलपमेंटला मोठी संधी 
- प्रदूषण न करणाऱ्या ॲक्‍टिव्हिटी होणार 
- आवश्‍यकतेनुसार कंपन्या प्रशिक्षण देणार 
 

"प्रत्येक जिल्ह्यात एक आयटी पार्कची केंद्र सरकारची योजना बंद झाली आहे. त्याऐवजी हार्डवेअर अॅण्ड सॉफ्टवेअरसह आयटी कंपन्यांना सामावून घेणारा इलेक्‍ट्रॉनिक्‍स पार्क उभारण्याची योजना आकाराला आली. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली जाणार आहे."

 
- ललित गांधी, अध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT