12 Out Of 18 Projects In Chandgad Taluka Overflow Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

"या' तालुक्‍यातील 18 पैकी 12 प्रकल्प ओव्हरफ्लो, तीन मध्यम प्रकल्प भरले

सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍यातील जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व आंबेवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प आज पहाटे पूर्ण क्षमतेने भरले. आज अखेर तालुक्‍यातील सर्व तीन मध्यम प्रकल्प, तर 15 लघू पाटबंधारे प्रकल्पापैकी 12 प्रकल्प भरले आहेत. 

जंगमहट्टी प्रकल्पात आज पहाटे 7 वाजता पूर्ण क्षमतेने 1223.33 दशलक्ष घनफूट, तर आंबेवाडी प्रकल्पात पहाटे 6 वाजता 7.112 दशलक्ष घनफूट एवढ्या पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला आहे. फाटकवाडी प्रकल्प28 जूनला भरला. त्यापाठोपाठ जांबरे प्रकल्प 8 जूलैला भरला. दिंडलकोप 2.814, जेलुगडे 4.860, कळसगादे 1.914, किटवाड क्रमांक 1 5,533, किटवाड क्रमांक 2 5.926, पाटणे 4,530, सुंडी 2,593 व काजीर्णे 4,330 एवढ्या पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

हेरे 87.65, करंजगाव 45.66, खडकओहोळ 44.82, कुमरी 66.80, लकीकट्टे 88.15, निट्टूर क्रमांक 2 59.71 क्षमतेने भरले आहेत. जंगमहट्टी प्रकल्प भरल्यामुळे सांडव्यातून बाहेर येणारे पाणी ताम्रपर्णीच्या प्रवाहात येत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास पूरस्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT