120 Farmers In Ajara Turned To Organic Farming Kolhapur Marathi News
120 Farmers In Ajara Turned To Organic Farming Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा तालुक्यातील 120 शेतकऱ्यांनी 150 एकर क्षेत्रात अवलंबली 'ही' शेती

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यात सेंद्रिय शेतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेंद्रिय गटाच्या माध्यमातून तालुक्‍यात 120 शेतकरी कार्यरत आहेत. गेली चार पाच वर्षांपासून काजू, भाजीपाल्याची शेती केली जात आहे. परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) या योजनेतून कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन व अनुदान दिले आहे.

सेंद्रिय उत्पादनाला ग्राहकांकडून मागणी होत आहे. या काही वर्षात शासनाकडून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी जोडले जावेत. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने गाव पातळीपासून पावले उचलली जात आहेत.

चार वर्षांपूर्वी आलेल्या पंरपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तालुक्‍यातीत झुलपेवाडी, देवर्डे व सरंबळवाडी येथे सेंद्रिय गट स्थापन झाले. या गटात 120 शेतकरी कार्यरत असून 150 एकर क्षेत्रात उत्पादन घेतले जात आहे. त्यांना परंपरागत कृषी विकास योजनेतून अभ्यास दौरा, प्रशिक्षण, गांडूळ युनिट, जैविक कीडनाशक, जैविक विविधता, जैविक खते तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क तयार करणे यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याचा चांगला फायदा झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

यामध्ये झुलपेवाडी येथील चिकोत्रा सेंद्रिय उत्पादक गटाने गेले वर्षेभर सेंद्रिय भाजीपाला विक्री सुरू केली आहे. त्याच्या भाजीपाल्याला मोठी मागणी असून कोल्हापूर, सांगली व कोकणात दररोज अर्धाटन भाजीपाला विक्रीसाठी जात आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्‍यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

आत्मांतर्गत झालेल्या ऑनलाईन बैठकीतील मुद्दे 
- आठवडी बाजारात सेंद्रिय उत्पादनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी 
- सेंद्रिय उत्पादनासाठी जिल्हास्तरावर ऍग्रो कंपनीची स्थापना करावी 
- कृषी विभागाने सेंद्रिय प्रमाणपत्र व आवश्‍यक कागदपत्रांसाठी पाठपुरावा करावा 
- पुणे, मुंबई बाजारपेठेत माल विक्रीसाठी प्रयत्न करावेत 

ग्राहकांकडून प्रतिसाद
2016 साली पंरपंरागत कृषी विकास योजनेला सुरवात झाली. या योजनेतून तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत असून त्यांच्या मालाला चांगला दर व बाजारपेठ उपलब्ध होत आहे. ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. 
- अमित यमगेकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, आजरा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT