Radhanagari Kalammawadi Dam esakal
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; भोगावती, पंचगंगा तुडुंब

सध्या जेवढा पाण्याचा विसर्ग होतो तो राधानगरीपासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत ठिकठिकाणी अडवला जातो.

सकाळ डिजिटल टीम

पाटबंधारे विभागाने राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातील (Kalammawadi Dam) गैबी बोगद्यातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

कोल्हापूर : शिरोळ (Shirol) तालुक्याला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) ८५०, तर काळम्मावाडी धरणातून (गैबी बोगदा) ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी (Panchganga River) दुतर्फा ओसंडून वाहत आहे.

शेतीसह पिण्याच्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. सध्या जेवढा पाण्याचा विसर्ग होतो तो राधानगरीपासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत ठिकठिकाणी अडवला जातो. त्यामुळे पंचगंगा नदीतून शिरोळ तालुक्याला पुरेसे पाणी जात नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातील (Kalammawadi Dam) गैबी बोगद्यातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

काल दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. वाढीव पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी जाण्यास मदत होणार आहे. धरणात सध्या दीड टीएमसी पाणीसाठा आहे. जून महिन्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. पावसाळ्यापूर्वी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले जाणार आहे. तसेच, आवश्‍यक असणाऱ्या ठिकाणी पाणी सोडून धरणातील पाणीपातळी योग्य प्रकारे ठेवली जाणार आहे. दरम्यान, आज सोडलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात नदीपात्रात ज्या-ज्या ठिकाणी वीजपंप रिकामे पडले आहेत ते पंप सुरू करून शेतीला पाणी देण्यास मदत होणार आहे.

शिरोळ तालुक्यासाठी पाणी देण्याबाबत वारंवार मागणी होत होती. दरम्यान, भविष्यातील पाण्याचे नियोजन करून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

-स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT