140 millimeters rain registered only in one hour panhala fort in kolhapur 
कोल्हापूर

ढगफुटीमुळे झाले ऐतिहासिक पन्हाळागडाचे नुकसान

मतीन शेख

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा पन्हाळगड. हिरवाई आणि धुक्‍याने नटलेला; पण मंगळवारी (८) सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. परिसरात कायम रिमझिम बरसणाऱ्या पावसाने त्या दिवशी कहर केला. अवघ्या पाऊण तासांत १४० मिमी. पाऊस नोंदला. विक्रमी पावसाने तीन दरवाजा रस्ता आणि साधोबा तलावाच्या तटबंदीचे नुकसान झाले. निसर्गासह मानवी चुकाही नुकसानीस कारणीभूत आहेत. या कारणांचा ग्राऊंड रिपोर्टमध्ये घेतलेला आढावा..

तीन दरवाजातील रस्ता उखडला

तीन दरवाजातून सोमवार पेठेकडे रस्ता जातो. फरसबंदी (दगडी) असणाऱ्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी डांबरीकरण केले. मंगळवारी झालेल्या पावसामुळे रस्ता उखडला. पाण्याचा लोट दरवाजातून वेगाने प्रवाहित होत उखडून वर आला. रस्त्याखाली टाकलेले पाईप कमी व्यासाचे असल्याने दबाव वाढून रस्ता उखडल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरवाजासमोर नव्याने बांधलेली तटबंदीची भिंतही कोसळली.

शिवकालीन सांडपाणी व्यवस्था

गडावरील अतिरिक्त पाणी जाण्यासाठी दगडी बांधीव पाटाची व्यवस्था शिवकालात केली. तीन दरवाजाच्या उजव्या बाजूला तिचे अस्तित्व पाहायला मिळते. गडावरील तलाव असो किंवा पावसाचे पाणी याच दगडी पाटातून गडाबाहेर पडते. पाण्याचा निचरा होण्याकरिता गडावर तत्कालीन स्थितीत घेतलेली दक्षता त्यातून दिसून येते. सांडपाण्यासाठीही केलेली व्यवस्था उत्कृष्ट आहे. मात्र, सध्याची व्यवस्था कमकुवत ठरली आहे.

"तीन दरवाजाच्या बांधकामावर पावसाचा परिणाम झालेला नाही. भविष्यात ढगफुटीसदृश पावसाने वास्तूच्या अस्तित्वाला धोका पोचू शकतो. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला जातो. निधीच्या कमतरतेने काम करण्यावर मर्यादा येते."

- विजय चव्हाण, पुरातत्त्व अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT