कोल्हापूर

कोरोनामुक्तीसाठी 1500 खासगी डॉक्‍टरही सरसावले

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी असणाऱ्या कोरोना केअर सेंटरवर खासगी 1500 खासगी डॉक्‍टर विनाशुल्क सेवा बजावणार आहेत. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यात डॉक्‍टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शासकीय डॉक्‍टर, नर्सिस, आशा, अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांसह खासगी डॉक्‍टरही कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे झाले आहेत. 
कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई, पुणे, सोलापूर, पालघरसह राज्य आणि परराज्यातून हजारो लोक येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. यासाठी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य विभाग, सीपीआर प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वतीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला जात आहेत. याला आता खासगी डॉक्‍टरही हातभार लावला आहे. प्रत्येक तालुक्‍यात सुमारे 1500 डॉक्‍टर काम करतील. यासाठी डॉक्‍टरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर कोरोनामुक्त करण्यासाठी खासगी डॉक्‍टर घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शाहूवाडीव्यतिरिक्त इतर तालुक्‍यात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये याचे नियोजन केले जात आहे. यासाठी आरोग्य विभाग सर्वांशी समन्वय साधत आहे. केअर सेंटरमध्ये येणाऱ्या सर्वांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी हे खासगी डॉक्‍टर काम करतील. 

जिल्ह्यात 14 सेंटर 
जिल्ह्यात 14 कोविड केअर सेंटर आहेत. या प्रत्येक सेंटरवर सकाळी 3 व रात्री 3 असे प्रत्येक दिवशी सहा डॉक्‍टर आपली सेवा बजावतील. याचे शाहूवाडी तालुक्‍यात सध्या डॉक्‍टरांचे एक तुकडी काम करत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT