160 villages in Kolhapur district do not have cemeteries 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 160 गावांना नाहीत स्मशानभूमी ​

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : जिल्ह्यातील 1025 गावांपैकी 160 गावांना अद्यापही स्मशानभूमी नाही. काही गावांतील स्मशानभूमी या वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे खराब झाल्या आहेत. या सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहे. कोरोनामुळे निधी नसल्याने अनेक स्मशानभूमींची कामे रखडली आहेत. मार्चपूर्वी तरी ही कामे मार्गी लागावीत, अशी मागणी लोकप्रतिनिधी करत आहेत. 

"गाव तिथे स्मशानभूमी' करण्याचे धोरण जिल्हा परिषदेने घेतले आहे. पाच वर्षांपूर्वी गावोगावच्या स्मशानभूमी बांधण्याचे धोरण राबवले, मात्र दरम्यानच्या काळात अपूर्ण स्मशानभूमी दुर्लक्षित राहिल्या. किरकोळ दुरुस्तीसाठी ठराविक सदस्यांनी निधी दिला, मात्र वाऱ्यासह आलेला पाउस, महापूर यामुळे अनेक स्मशानभूमी जमीनदोस्त झाल्या. शहराच्या आजूबाजूला तसेच विविध गावांतील स्मशानभूमीची पडझड झाली. 
या दुरुस्तीचे प्रस्तावही अतिवृष्टी व पूरहानी या निधीतून करण्यासाठी सादर केले, मात्र अनेक गावांकडे स्मशानभूमीच नसल्याने पहिले त्यांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. 

तालुकानिहाय स्मशानभूमी नसलेली गावे 
तालुका ग्रामपंचायत संख्या स्मशानभूमी नाही 
*आजरा 73 5 
*भुदरगड 97 17 
*चंदगड 109 26 
*गगनबावडा 29 2 
*गडहिंग्लज 89 19 
*हातकणंगले 60 1 
*कागल 83 15 
*करवीर 118 1 
*पन्हाळा 111 14 
*राधानगरी 98 34 
*शाहूवाडी 106 16 
*शिरोळ 52 2 


स्मशानभूमी ही गावांची गरज आहे. सर्व गावांचे सर्वेक्षण केले आहे. 160 गावांना स्मशानभूमीची गरज आहे. या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती, नरेगा व 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यात येईल. त्याचाही आराखडा करण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामांना सुरवात होईल. मार्चपूर्वी जिल्ह्यातील सर्व गावात स्मशानभूमी बांधण्याचे नियोजन आहे. 
- अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT