Gokul Dudh Sangh Kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्हापुरातून बाहेर जाणारे 2 लाख लिटर दूध 'गोकुळ'कडे वळवण्याचे आव्हान; 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण!

कोल्हापूर जिल्ह्यात १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अडीच वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाले. यावेळी प्रतिदिन १२ लाख ५० हजार लिटर दूध संकलन होते.

कोल्हापूर : ‘अमुल’सारख्या दूध संघाचे आक्रमण परतवून लावण्याचे यश आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करण्यात यश मिळाल्याने हीच आनंदराव पाटील-चुयेकर यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेरील राज्यातील संघाकडे जाणारे दोन लाख लिटर दूध गोकुळकडे (Gokul Milk) वळविण्याचे आव्हान आहे.

गोकुळ राज्यात सर्वाधिक दर देणारा संघ आहे. त्यामुळे बाहेर जाणारे दूध गोकुळकडे येईल,’ असा विश्‍वास पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांची दहावी पुण्यतिथी आणि ‘गोकुळ’चे प्रतिदिन १७ लाख लिटर दूध संकलन पूर्ण केल्याबद्दल गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अमृत कलशपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘अडीच वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाले. यावेळी प्रतिदिन १२ लाख ५० हजार लिटर दूध संकलन होते. काही वेळेला गुजरात, राज्यस्थानमधून दूध खरेदी केले. पण, त्याला तेवढी चव नव्हती. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचे दूध हवे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातच शेतकरी आणि तरुणांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात दूध संकलनाला खूप मोठी संधी आहे. यासाठी जिल्ह्यातून बाहेर जाणारे दोन लाख लिटर दूध गोकुळकडे वळवले पाहिजे. मुंबईमध्ये गोकुळचे दूध म्हटले की डोळे झाकून खरेदी केले जाते. उपपदार्थ निर्मितीवर भर दिला जाईल.’

‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ म्हणजे दर्जा आहे. राज्यात सर्वाधिक दर गोकुळकडूनच दिला जात आहे. तसेच, गायीच्‍या दुधाच्या अनुदानाची रक्कमही सभासदांना देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.’ यावेळी माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, माजी आमदार संजय घाटगे, संचालक युवराज पाटील, बाबासाहेब चौगले, आदी संचालक उपस्थित होते.

आता नोकरभरती नको

‘गोकुळचे २० लाख लिटर दूध संकलन होणार म्हणून भरमसाठ नोकर भरती केली. आता ३० लाखांचे उद्दिष्ट्य ठेवून पुन्हा नोकर भरती होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. गोकुळमुळेच शेतकऱ्यांना पाठबळ असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

कर्नाटकमधील नंदिनी दुधाचे नवे आव्हान

‘कर्नाटकमधील ४.० फॅट आणि ९.० एसएनएफचे दूध बाजारात आणले आहे. त्यामुळे हे आव्हान आपल्यासमोर आले आहे. यासंदर्भात वितरकांमध्ये झालेल्या चर्चेत वितरकांनी ४.० फॅट आणि ९.० एसएनएफच्‍या दुधाचा ब्रँड तयार करा. आम्ही एक लाख लिटर दूध तीन महिन्यांत विक्री करून दाखवतो’, असे विक्रेत्यांनी सांगितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘गोकुळ’ राज्याचा ब्रँड करावा

‘कर्नाटकमधील नंदिनी दूध संघाला दूध देणाऱ्या उत्पादकांच्या दुधाला अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे राज्यात गोकुळ दूध संघालाच दूध घालणाऱ्या उत्पादकांच्या दुधाला अनुदान देण्याची घोषणा करून राज्य शासनाने गोकुळ राज्याचा ब्रँड करावा,’ अशी मागणी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी आज केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT