19th Sugarcane Conference of Swabhimani Shetkari Sanghatana 
कोल्हापूर

‘स्वाभिमानी शेतकरी’ ऊस परिषदेत आखली जाणार आंदोलनाची रणनीती

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर)  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद आज (ता. २) दुपारी दोनला जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन होणार आहे. एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाची रणनीती या वेळी आखली जाईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी परिषदेत आंदोलनाची घोषणा आणि दराची मागणी करतील. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकार मादनाईक, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


 (ता. ३१) साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यात शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा साखर कारखानदारांनी केली. मात्र, तोडणी मजुरांच्या मजुरीत केलेली १४ टक्के दरवाढ शेतकऱ्यांच्याच ‘एफआरपी’मधून दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा कारखानदारांनी एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. 


 सोशल मीडियावरून प्रसारण 
दरवर्षी हजारो ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत होणारी ऊस परिषद यंदा मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन होत आहे. परिषदेचे सोशल मीडियावरून प्रसारण करण्यात येणार असल्याने ॲपद्वारे शेतकरी व कार्यकर्त्यांना लिंक शेअर करण्यात आली. संघटनेचे राज्यातील फक्त पदाधिकारी उपस्थित राहतील. या परिषदेतील निर्णयाकडे कारखानदारांचे लक्ष लागले आहे. 

संघटनेच्या मागण्या  
- ऊसतोडणी मजुरांना दिलेली दरवाढ ‘एफआरपी’मधून घेतली जाणार असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी 
- गत हंगामातील २०० रुपये तत्काळ द्यावेत 
- एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT