19th Sugarcane Council information for Raju Shetty President of Swabhimani Shetkari Sanghatana 
कोल्हापूर

ऊस परिषद होणारच : राजू शेट्टींचे बिगुल , दर ठरल्याशिवाय धुराडी पेटवल्यास इशारा

सकाळ वृत्तसेवा

शिरोळ (कोल्हापूर) :  यंदाची १९ वी ऊस परिषद कोणत्याही स्थितीत घेतली जाणार आहे. ऊस परिषदेत दराचा निर्णय झाल्याशिवाय, कारखानदारांनी धुराडे पेटवू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ऊस परिषदेची तारीख लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.

चालू वर्षीच्या गळीत हंगामाचे बिगुल वाजू लागले आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक झाली.


शेट्टी म्हणाले, ‘‘आठवडाभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी गावोगावी शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊस परिषदेची तयारी करावी. गावबैठकीमध्ये साखर कारखान्याकडून तीन टप्प्यात एफआरपी देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने कार्यकर्त्यांनी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याना एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले.

सरकारने सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी.’’प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकर मादनाईक, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, अजित पोवार, राम शिंदे, शैलेश आडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी 
उपस्थित होते. 

परिषदेस परवानगी मिळणार काय?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची, ऊस परिषद जयसिंगपूर येथे होते. परिषदेत राज्यातून तसेच सीमाभागातून ऊस उत्पादक शेतकरी  हजारोच्या संख्येने येतात. कोरोना संसर्गजन्य असल्याने ऊस परिषद घेणे धोक्‍याचे होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन, ऊस परिषद घेण्यास परवानगी देणार काय आणि परवानगी दिली तर सोशल डिस्टन्स पाळले जाणार काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT