20 lakh bribe case crime marathi news 
कोल्हापूर

फिल्मी स्टाईलने सांगलीतील व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या  चौघांच्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एक कोटीचे कर्ज देण्याच्या अमिषाने सांगलीतील व्यापाऱ्याला फिल्मी स्टाईल 20 लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांच्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी 15 दिवसात छडा लावला. टोळीकडून 15 लाखांची रोकडही जप्त केली. सूत्रधार शिवाजी लक्ष्मण शेळके (वय 46), तोतया पोलिस संदीप ज्ञानदेव लाड (32) व राजू शिवाजी मिसाळ (38, तिघे रा. सातार्डे, पन्हाळा) व साथीदार भीमराव मारूती लाड (54, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी 
अनिल विश्‍वासराव पाटील (येळावी, ता. तासगाव) येथे राहतात. त्यांचा शेती व केमिकल ऑईलचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या भामट्याने एक कोटीचे कर्ज कमी व्याजदरात देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी 20 लाख रुपये अनामत ठेवावे लागेल, असे सांगितले. टोळीतील म्होरक्‍याने त्यांना 4 मार्चला सकाळी तावडे हॉटेल परिसरात बोलवून घेतले. म्होरक्‍या साथीदारासह तेथे गेला. त्याने साथीदाराला ही रक्कम घेऊन जा व कर्जाची एक कोटीची रक्कम घेऊन ये, असे सांगितले. तसा तो गेल्यानंतर दोघे तोतया पोलिस तेथे आले. त्यांनी सूत्रधाराला ताब्यात घेतल्याचा बहाणा करत तेथून निसटले. याबाबत आपली फसवणूक झाल्याची तक्रार अनिल पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. तसा अत्यंत गुंतागुतीच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला. 

खोटी नावे व परराज्यातील सीम कार्ड
गंडा घालणाऱ्या टोळीने बनावट नावाचा आधार घेतला होता. सूत्रधाराने बरवराज पाटील (रा. दूधगाव) व विजय पाटील (रा. सावंतवाडी) अशा बनावट नावांसह पत्त्याचा व परराज्यातील सीम कार्डचा वापर केल्याची माहिती तपासात पुढे आली. कॉन्स्टेबल दिग्विजय चौगले यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गोपनीय माहिती संकलित केली. त्यात संशयित सूत्रधार बसरवाज पाटील याचे खरे नाव शिवाजी शेळके असल्याचे स्पष्ट झाले. संशयित दिवसभर नाही तर फक्त रात्रीच घरात येत असल्याचेही तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने वेषांतर करून सातार्डे गावी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने संशयित संदीप लाड, राजू मिसाळ, भीमराव लाड या साथीदारांच्या मदतीने कृत्य केल्याची कबुली दिली. संदीप व राजू तोतया पोलिस बनलल्याचेही चौकशीत पुढे आले. त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील 15 लाख 9 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या सर्वांना न्यायालयाने 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावली. 
 
तपासाचे शिलेदार 

ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके, कर्मचारी दिग्विजय चौगले, अनिल पाटील, दिगंबर पाटील, शुभम संकपाळ, सुशील सावंत, जगदीश बामणीकर यांनी केली.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT