200 to 300 patients daily for minor check up at Savitribai Phule Hospital 
कोल्हापूर

सावित्रीबाई फुले रुग्णालयात किरकोळ तपासणीसाठी दररोज 200 ते 300 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : किरकोळ आजार बरे करण्यासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालय आधार ठरले आहे.  सर्दी, ताप, खोकल्याचे दररोज 200 ते 300 रुग्ण बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी येतात. जून ते ऑगस्टचा विचार करता 401 महिलांची येथे प्रसूती झाली. काही खासगी व सरकारी रुग्णालये केवळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने फुले रुग्णालयात रुग्णांचा आकडा वाढला आहे. 
मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्‍कील होते. किरकोळ आजारांच्या रुग्णांना दवाखान्यात उपचार घेण्याची सवलत होती. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलून ग्रामीण रुग्णांसाठी आधारवड असणारे सीपीआर कोरोनासाठी राखीव ठेवले. काही खासगी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाले. त्यामुळे होतकरू कुटुंबातील रुग्णांनी जायचे कोठे, असा प्रश्‍न निर्माण झाला. कमी पैशात औषधोपचार होण्यासाठी रुग्ण आजही फुले रुग्णालयात उपचारासाठी येतात. सर्जिकल वॉर्डमध्ये 25 खाट असून 16, मेडिकलमध्ये 30 खाटपैकी 17 रुग्ण उपचार घेत आहेत. लेबर रूममध्ये 25 खाट असून 40 महिलांची प्रसूतीसाठी नोंद आहेत. जूनमध्ये नैसर्गिक 50 व सिझेरियन 42, जुलैमध्ये नैसर्गिक 53 व सिझेरियन 49, तर ऑगस्टमध्ये नैसर्गिक 116 व सिझेरियन 91 अशी प्रसूतीची आकडेवारी आहे. ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी फुले रुग्णालयाचा आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे येथील महालॅबमधून दररोज पन्नास रुग्ण रक्त तपासणीसाठी येतात. 

शहरातील रुग्णालये अशी: 
*सरकारी रुग्णालये- 2 
*महापालिका रुग्णालये- 12 
*खासगी रुग्णालये- 360 (पैकी 10 रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी राखीव) 


सावित्रीबाई फुले रुग्णालय 
*केसपेपर - 5 रुपये 
*एक्‍सरे - 90 रुपये 
*सिझेरियन - 1300 रुपये 
*नैसर्गिक प्रसूती - 40 रुपये 
*महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 960 आजारांवर शस्त्रक्रिया 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT