200 crore GST evasion racket detected 
कोल्हापूर

200 कोटी जीएसटी चोरीच्या रॅकेटचा शोध: प्रमुख सूत्रधारांना अटक  

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंटेलिजेंस डायरेक्‍टोरेट जनरलच्या बंगळूर शाखेने (बीझेडयू) नुकतीच सुमारे 200 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा शोध घेतला आहे. या घोटाळ्यामागील काही महत्त्वाच्या सूत्रधारांना ताब्यात घेतले आहे. 


गेल्या काही आठवड्यात देशभरात सुसूत्र शोध मोहिमांमध्ये डीजीजीआय, बीझेडयूने जीएसटी फसवणूक उघडकीस आणली. त्यामध्ये 1,000 कोटीच्या बनावट पावत्या तयार करण्यात गुंतलेल्या काही सुप्रसिद्ध कंपन्यांनी 200 कोटीच्या आसपास जीएसटी चुकविण्यात आल्याचे आढळून आले आहे. 
एका मोठ्या कारवाईत बंगळूरस्थित टेक कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल केला. कोणतीही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता देशातील प्रस्थापित चिनी कंपन्यांना बनावट पावत्या देण्यास गुंतवले गेले होते, असे एका डीजीजीआय, बीझेडयूने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

काही चिनी संस्थांनी या कंपनीला हस्तांतरित केलेली 500 कोटी रुपयांची रक्कम भारतातील कंपन्या, व्यक्तींना आणि अन्य संशयास्पद कार्यांसाठी पैसे देण्याकरिता वापरण्यात आल्याची माहिती आहे. चिनी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमांचे संयोजन केले. दुसऱ्या एका घटनेत, डीजीजीआय, बीझेडयूने दुसऱ्या खासगी मर्यादित कंपनीविरूद्ध राज्यातील काही सुप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांना (एमएनसी) माल न देता बोगस पावत्या पुरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. प्राप्त झालेल्या एमएनसीमधून 15 कोटींची मोठी वसुली झाली. फसव्या कंपन्यांच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकृत डीजीजीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 


जीएसटी चोरट्यांपैकी बंगळूरचा एक भंगार व्यापारी असून त्याने 6.5 कोटी रुपयांचे बनावट प्राप्तिकर क्रेडिट (आयटीसी) घेतले आहे. डीजीजीआय, बीझेडयूने 2019-20 मध्ये 1,038 कोटी रुपये वसूल केले असले, तरी 3,400 कोटी रुपयांचा कर चुकविला. 2020-21 दरम्यान आतापर्यंत 478 कोटी रुपयांची रक्कम वसूल केल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT