21 Posts Of Deputy Tehsildar Are Vacant In The District Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात नायब तहसीलदारची 21 पदे रिक्त

सुनील कोंडुसकर

चंदगड : जिल्ह्यात महसूल विभागाकडील नायब तहसीलदारची तब्बल 21 पदे रिक्त आहेत. महसूलशी संबंधित विविध कामांची पूर्तता ज्यांच्या सहीने होते ते महत्त्वाचे पद रिक्त असल्याने कामाचा निपटारा होत नाही. पयार्याने नागरिकांतून नाराजीचा आणि तक्रारीचा सूर आहे. 

महसूल विभागामध्ये निवासी नायब तहसीलदार हे महत्त्वाचे पद मानले जाते. त्याचबरोबर पुरवठा विभाग आणि निवडणूक नायब तहसीलदार ही पदेही महत्त्वाची असतात. तहसीलदारांना सहायक म्हणून त्यांचे काम असते. निवासी नायब तहसीलदारांच्या सहीने विविध कामांचा निपटारा केला जातो. कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पद करते. त्यामुळे कार्यालयात सुसूत्रता आणि शिस्त येते. परंतु हिच पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे तहसीलदार या मुख्य पदाच्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका, स्थानिक पातळीवरील जनसुनावणी, गाव भेटी यामुळे तहसीलदार बाहेरगावी गेल्यास ज्यांच्या सहीने कामे मार्गी लावता येतील, असा अधिकारीच नसल्याने कामे प्रलंबित रहात आहेत. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वेळेत काम उरकणे गरजेचे असते. मात्र सही नसल्याने त्याला वाट पहावी लागते. त्यात त्याचा वेळ आणि पैसा वाया जातो. निश्‍चित केलेले काम वेळेत दाखले, उतारे न मिळाल्यास रद्द होऊ शकते.

ही त्या नागरिकांच्या दृष्टीने मोठी हानी ठरते. गडहिंग्लज वगळता सर्वच तालुक्‍यात रिक्त पदांचा प्रश्‍न आहे. चंदगड तहसील कार्यालयात नायब तहसीलदारची सर्व तीनही पदे रिक्त आहेत. आजरा येथे एकाच अधिकाऱ्याकडून सर्व कामे करून घेतली जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात अशीच स्थिती आहे. 

बढती गरजेची 
अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती दिली जाते. जिल्ह्यात सेवा कालावधीनुसार प्रमोशन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना बढती देऊन रिक्त पदांचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आहे. 

तालुकानिहाय नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांची संख्या 
कोल्हापूर (जिल्हाधिकारी कार्यालय) - 5 
शाहूवाडी- 2 
राधानगरी- 2 
भुदरगड- 2 
गगनबावडा- 2 
हातकणंगले- 1 
शिरोळ- 2 
गडहिंग्लज- 0 
चंदगड- 3 
आजरा- 2 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango GI Tag : कोकण हापूस विरुद्ध गुजरातचा वलसाड हापूस वाद शिगेला! अंतिम सुनावणीत नेमकं काय घडलं? संपूर्ण कोकणाचे लक्ष निकालाकडे

Indian Railway Ticket Transfer Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऐनवेळी प्रवास रद्द झाल्यास तिकीट वाया जाणार नाही; घरच्यांच्या नावावर करता येणार ट्रान्स्फर, वाचा नियम

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : करवीरला दुष्काळी यादीतून वगळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

SCROLL FOR NEXT