211 road seals in Ichalkaranji 
कोल्हापूर

मोठी बातमी - कोरोनामुळे इचलकरंजीत 211 मार्ग झाले सील

संजय खूळ

इचलकरंजी : शहरात गेल्या 14 दिवसात कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विविध भागातून जाणारे तब्बल 211 मार्ग सील करण्यात आले. एकूण आजअखेर 20 भाग सील करण्यात आले असून त्यासाठी पालिकेची 2 पथके सतत दक्ष राहून काम करीत आहेत.

कोरोना संसर्ग एखाद्या भागात एखाद्या व्यक्तीस झाला की हा संसर्ग पसरू नये यासाठी भाग सील करण्याची प्रक्रिया सुरू होते. यासाठी तब्बल 19 जणांचे पथक काम करीत असते. पालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्याकडून अहवाल आल्यानंतर अभियंता विभागातील अधिकारी या पार्श्‍वभूमीवर काम सुरू करतात. ज्या ठिकाणी रूग्ण राहतो त्या ठिकाणापासून 300 मीटरचा परिसर सील करावा लागतो. यासाठी या ठिकाणी येणारे चारही बाजूचे सर्व रस्ते बंद करणे आवश्‍यक असते. परिसरापासून 300 मीटरचा अंतर निश्‍चित करून त्या त्या ठिकाणी बॅरेकेटस्‌ व पत्रे लावून येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येतात. याबाबतची सूचना मिळाल्यानंतर तातडीने हा विभाग काम करतो. 24 तास दक्ष राहून हा विभाग गेली 15 दिवस शहरातील अनेक भाग सील करण्याचे काम करीत आहे.

शहरात संसर्ग सुरू झाला तो कुडचे मळ्यातील रूग्णापासून. 24 जून रोजी हा भाग प्रथम सील करण्यात आला. त्यानंतर आजअखेर तब्बल 20 भाग सील करण्यात आले आहेत. यासाठी एकूण 211 मार्ग बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणाहून नागरिकांनी आतबाहेर करू नये यासाठी पोलिस प्रशासन आणि पालिकेचे आरोग्य कर्मचारी 24 तास दक्ष असतात.

शहरातील हे भाग झाले सील
* कुडचे मळा * दातार मळा * बोंगाळे गल्ली *संग्राम चौक *कृष्णा अपार्टमेंट *कलानगर *गोकुळ चौक *महात्मा गांधी हौसिंग सोसायटी * आवाडे मळा *लंगोटे मळा *संत मळा *हत्ती चौक *जयभवानी *राणाप्रताप चौक *महासत्ता चौक *सोडगे मळा

हे पथक असते दक्ष
नगरअभियंता संजय बागडे यांच्या नेतृत्वाखाली संबंधीत भाग कसा सील करायचा याचा संपूर्ण आराखडा अभियंता सुभाष देशपांडे हे करतात. अतिक्रमण विभागाचे सुभाष आवळे, धोंडीराम कांबळे यांच्यासह चार अभियंते आणि पालिकेचे कर्मचारी परिसर सील करण्यासाठी कार्यरत असतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

Pune News : चेहरा दाखवला तरच मिळणार पगार; झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम, महापालिकेने विकसित केले ॲप

Nagpur Goa Shaktipeeth Highway : भाविकांच्या भावनांशी खेळ? शक्तिपीठ महामार्गावरून माहूर तीर्थक्षेत्र थेट 17 किलोमीटर लांब ढकलले; नव्या नकाशात कोणता केला बदल?

SCROLL FOR NEXT