23 goats were stolen from Mangao Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

माणगावातून 23 बकरी चोरीस

सकाळवृत्तसेवा

कोवाड : माणगाव (ता. चंदगड) येथील अनिल गुंडू फडके या शेतकऱ्याच्या तेऊरवाडीच्या हद्दीत असलेल्या शेडमधील 23 बकरी चोरट्यांनी चोरून नेली. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी फडके शेताकडे गेल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनाला आला. बकरी चोरी झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला आहे. अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा फडके यांनी दावा केला असून कोवाड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

चार दिवसांपूर्वी खामदाळ येथे 80 पाळीव डुकरांची चोरी झाली होती. आज पुन्हा फडके यांच्या 23 बकऱ्यांची चोरी झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. 
अनिल फडके माजी सैनिक आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकरी पालन सुरू केले आहे. गेल्या वर्षी शेडमधून चार बकऱ्यांची चोरी झाली होती. यावर्षी पुन्हा बुधवारी रात्री दरवाजा तोडून 23 बकरी चोरून नेली आहेत.

बकऱ्यांचे शेड मोकळे झाल्याने फडके यांना धक्काच बसला आहे. चारचाकीतून बकरी पळवून नेल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे शेतातून जनावरांचे शेड असलेल्या शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. एकाच आठवड्यात तालुक्‍यात या दोन मोठ्या चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चोरट्याना तात्काळ पकडावे,अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे. 

तपास गतीने करावा 
एकाच आठवड्यात चंदगड तालुक्‍यात दोन पाळीव प्राण्यांच्या चोरीच्या मोठ्या घटना घडल्याने शेतातून प्राण्यांचे शेड असलेल्या शेतकऱ्यांच्यात भिती निर्माण झाली आहे. पोलिस विभागाने तपासाची यंत्रणा गतीमान करुन चोरट्याना जेरबंद करावे,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT