24 hours digital patrolling in the kolhapur city now  
कोल्हापूर

शहरात आता 24 तास  डिजिटल पेट्रोलिंग... 

राजेश मोरे

कोल्हापूर : नव्या वर्षात आता शहरासह परिसरात डिजिटल पेट्रोलिंग सुरू होणार आहे. शहरातील चारही पोलिस ठाण्यांना एक मोबाईल व्हॅनसह चार मोटारसायकल गस्तीसाठी असतील. त्याद्वारे शहरात 24 तास गस्त घालण्यात येईल. ही सर्व वाहने कंट्रोलरूमला (100 क्रमांकाला) जोडण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. 

शहर परिसरात चेन स्नॅचिंग, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, तोतया पोलिसांकडून गंडा, चोऱ्या अशा घडणाऱ्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आता पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात चोवीस तास पोलिसांचे पेट्रोलिंगचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यासाठी शहरातील चारही पोलिस ठाण्याला एक मोबाईल व्हॅन, चार मोटारसायकलही देण्यात येईल. 

गस्त वाहनांना क्‍यूआर कंट्रोलिंग... 
सर्व वाहनांना क्‍यूआर कंट्रोलिंग असल्याने पोलिसांकडून कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली गेली. याची तारीख, वेळ व ठिकाणानुसार नोंदींची माहिती जमा होते. त्यानुसार संबंधित बीट मार्शलनी नियोजित ठिकाणी गस्त घातली की नाही, 100 क्रमांकावर आलेल्या सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निरसन केले की नाही, याच्यावर वरिष्ठांकडून तपासणी केली जाणार आहे. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व पोलिस उपअधीक्षकांना याचे सिस्टीम तपासण्याचे अधिकारही लॉगिंग, पासवर्डसह देणार असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

200 ते 250 पॉईंट निश्‍चित... 
शहरात गर्दीचे, रहदारीसह चेन स्नॅचिंग, ज्येष्ठांना गंडा घातले गेलेले असे सुमारे 200 ते 250 पॉईंट गस्तीसाठी निश्‍चित करण्यात आले आहेत. यात शाळा, महाविद्यालयांचाही समावेश आहे. या ठिकाणी ठरवून दिलेल्या दिवशी व निश्‍चित केलेल्या वेळेत संबंधित वाहनांद्वारे गस्त घातली जाईल. 

शहर परिसरात 24 तास गस्तीचे नियोजन केले आहे. त्यासाठी मोबाईल व्हॅनसह चार मोटारसायकल पोलिस ठाण्यांना देण्यात येणार आहेत. ही वाहने कंट्रोलरूमला जोडण्यात येतील. 
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

Pune Shirur crime News: शिरूरमध्ये मातृत्वाला काळिमा; दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या ११ महिन्याच्या यशचा खून करून विहिरीत टाकल्याची कबुली

SCROLL FOR NEXT