kolhapur sakal
कोल्हापूर

31st Celebration : नाकाबंदीसह वाहनांची कागदपत्रेही तपासणार

थर्टी फर्स्टसाठी ५१ ब्रेथ ॲनालायझरची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : इंग्रजी वर्षाखेर अर्थात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’मुळे अपघात होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ५१ ब्रेथ अॅनालायझरची व्यवस्था केली आहे. सुमारे दीड हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, शंभर होमगार्ड आणि त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची एक कंपनीही रात्रभर रस्त्यावर असणार आहे.

ठिकठिकाणी नाकाबंदी असून वाहनांचीही कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कोणतीही कसूर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षाखेर म्हणून ३१ डिसेंबरची रात्री जल्लोष करण्यासाठी आता ऑनलाईनसह हॉटेल, रेस्टॉरंट, बीअरबार, परमिट रूममध्ये तयारी सुरू झाली आहे. आकर्षक विद्युतरोषणाईसह मेनूंच्या ऑफरचा धडाका आहे. या उत्साहाच्या वातावरणातच पोलिस प्रशासनानेही त्यांची तयारी केली आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रभारी अधिकाऱ्यांना चौकाचौकात नाकाबंदी करणे, वाहनांवर लक्ष्य केंद्रित करून विनानंबर प्लेटचे वाहन ताब्यात घेणे, मोटारींच्या कागदपत्रांची तपासणी करणे, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची चाचणी ‘ब्रेथ ॲनालायझर’ने करावी, अशा सूचना केल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये ब्रेथ ॲनालायझरची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडेही त्याची व्यवस्था केली आहे.

पोलिसांकडून सायंकाळी सातपासूनच रस्त्यावर बंदोबस्त असणार आहे. सुमारे तीनशे होमगार्डही रस्त्यावर असणार आहेत. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जात आहे. तरीही राज्य राखीव दलाची एक कंपनी (सुमारे ९० जवान) ही तैनात ठेवण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या : बलकवडे तळीरामांमुळे आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT