35 Lakh Funding For Mahagao : Musharif Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

महागावसाठी 35 लाखांचा निधी : मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा

महागाव : आमचे सरकार गोरगरिबांचे सरकार आहे. आमच्यात कोणताही भेदभाव नाही. विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता लोकांसाठी काम करत राहणार. तसेच आमचे सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारित असल्याने पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या वेळी महागाव ग्रामपंचायतीला 35 लाखांचा निधी त्यांनी जाहीर केला. 

महागाव (ता.गडहिंग्लज) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, प्रा. किसनराव कुराडे, विजयराव पताडे यांची उपस्थिती होती. 
मुश्रीफ म्हणाले, ""भाजपचे स्वप्न भंग झाले आहे त्यामुळे ते या सरकार बद्दल विविध विधान करत आहेत. त्यामुळे लोकांनी तिकडे लक्ष न देता सरकारच्या बाजूने भक्कम उभे राहावे. तुम्हाला सरकारी कामाबद्दल कोणतीही अडचण निर्माण झाली,तर कोल्हापुरात आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. महात्मा गांधींचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया.'' या वेळी प्रा. कुराडे, जि. प. उपाध्यक्ष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला जि. प. सदस्य हेमंत क़ोलेकर, ऍड. आण्णासाहेब चव्हाण, गोडसाखर संचालक प्रकाश पताडे, किरण पाटील, बालकृष्ण परीट, सरपंच ज्योस्ना पताडे, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, नानासाहेब पताडे, बाबासाहेब पाटील, तुकाराम सुरगे, अनिल कुराडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

पताडे गटाचा राष्ट्रवादीत प्रवेश 
महागाव येथील पताडे गटाने प्रकाशभाई पताडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प .चे उपाध्यक्ष सतिश पाटील होते. यावेळी सरपंच ज्योस्ना पताडे, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, ग्रा. प. सदस्य अमर कडाकणे, सचिन रेडेकर, भारत कूंभार, रुक्‍मिणी रेडेकर, स्मिता महंत, महानंदा कांबळे, रंजना सुरंगे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT