4000 travel bag are available in market for buyers prices also high from 1000 to 1 lakh in kolhapur 
कोल्हापूर

आता प्रवासी बॅगांचा पॅटर्न बदलला ; चार हजार प्रकार ग्राहकांसाठी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : प्रवासी बॅग म्हटले की ‘टिपिकल पॅटर्न’ समोर येतो. मात्र, प्रवासी बॅगांत तब्बल चार हजारांहून अधिक प्रकार, डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. कोणत्या प्रवासाला जाणार, त्यावर बॅगेचा प्रकार-आकार ठरतो. ‘हार्ड’ आणि ‘सॉफ्ट’ या प्रमुख दोन प्रकारानंतर त्याचे वैविध्य सुरू होते. त्यांच्या किमतीही एक हजारापासून एक लाखांपर्यंत आहेत.

सुरक्षित प्रवासाबरोबर साहित्य सुरक्षित राहील, यालाही अलीकडे प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सॉफ्ट बॅगांमध्येही पालीस्टर, कॉटनमधून येतात तर हार्ड (कठीण) बॅगा एबीएस (ठराविक प्लास्टिक), पॉली पोपलीन (पीपी) आणि अलीकडे हलक्‍या वजनाची लवचिक पण कठीण अशा पॉली कार्बोनेटद्वारे बॅगांची निर्मिती झाली आहे. हे प्लास्टिक रि-सायकल होऊ शकत असल्याने त्याची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहे. वजनाने हलकी असल्यामुळे याला अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. 

‘कमर्शिअल’ आणि ‘नॉन कमर्शिअल’ अशा दोन्ही प्रकारच्या बॅगा बाजारात आहेत. विशेष करून इलेक्‍ट्रॉनिक साहित्यासाठी स्वतंत्र बॅगांची निर्मिती होते. किमती वस्तू सुखरूप राहण्यासाठी त्यांना आतील बाजूने स्पंज व इतर साहित्य लावले जाते. यात सुमारे हजारांहून अधिक प्रकार आहेत. यांच्या किमती ही हजारात आहेत. प्रत्येक बॅग ही सम इंच आकारात (उदा २, ४, ६, १० इंच) असते. कारण रेल्वे, बस, विमान यात बॅगा ठेवण्यासाठी त्यांचा आकार निश्‍चित केला आहे. त्यामुळे १४ इंचापासून ते ३२ इंचापर्यंत या बॅगा तयार केल्या जातात. चेन, व्हील यासह इतर वस्तू तुटल्या तर त्या दुसऱ्या बॅगांच्या बसविता येत नाहीत. त्यामुळे किमती बॅगा विकत घेताना अधिक विचार होतो. 

सुरक्षितता महत्त्वाची

सॉफ्ट बॅगांवर कोणीही ब्लेड मारले तर त्या फाटतात. त्यातून वस्तू चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड (कठीण) बॅगांची निर्मिती केली आहे. यातून प्रवासाचे साहित्य सुरक्षित राहू शकते. तसेच, त्यांची ‘लॉक’ सिस्टीमही वेगवेगळ्या पद्धतीची असते. सुरक्षित साहित्यासाठी हा बदल केला आहे.

"मोजक्‍याच कंपन्यांचे वर्चस्व बॅगनिर्मिती क्षेत्रात आहे. केवळ दोनच प्रमुख कंपन्यांचा बॅगनिर्मितीच्या मार्केटमध्ये दबदबा आहे. इतर छोट्या-मोठ्या कंपन्या अद्याप ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या नाहीत. एकूण १२ कंपन्यांच्या मिळून बॅगांचे सुमारे चार हजार प्रकार मार्केटमध्ये आणले आहेत."

- जयेश पाटील, बॅग व्यापारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT