42 ambulance drivers of 108 ambulances; Over eight thousand Corona victims were taken safely 
कोल्हापूर

108 रुग्णवाहिकेचे 42 जिगरबाज चालक ;  आठ हजारांवर कोरोना बाधितांना नेले सुखरूप 

शिवाजी यादव

कोल्हापूर : दुर्गमवाडी, वस्तीपासून शहरातील गल्लीबोळ असे कुठेही रात्री अपरात्री कोण कोरोना पॉझिटिव्ह आला की, तर कुरकुर न करता 108 रुग्णवाहिकेचे चालक काही मिनिटात 108 रुग्णवाहिका घेऊन येतात. रुग्णाला घेऊन पुढे दवाखान्यात पोहचवतात. एका दिवसात दोन तर कधी दहा तर कोणी 25 अशा संख्येने रुग्णांची वाहतूक केली. ड्यूटीची वेळ, मोबदला याविषयी तक्रार न करता या 42 चालकांनी निष्ठेने सेवा केली आहे. जवळपास साडेआठ हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल केले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंर्तगत जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका जखमींना मोफत दवाखान्यात पोहचविण्याचे काम करते. त्यांची संख्या 36 आहे. यातील 23 रुग्णवाहिका चार महिने कोरोना बाधितांची वाहतूक करतात. 
एप्रिलपासून कोरोनाचे कोल्हापूर शहर शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी अशा सर्वच डोंगरी जंगली तालुक्‍यात गावागावांत बाधित रुग्ण सापडू लागले. बाधितांचे नाव, पत्ते घेऊन पायलट रुग्णवाहिका दामटत होता. गावात, वाडीवस्तीवर जायचं कुठे रस्ता कच्चा, खडकाळ तर कुठे वळणाचे घाट रस्त्यावरून गाडी वस्तीवर नेली जाते. रुग्णाला गाडीत घेताना काही ठिकाणी नातेवाइकांची रडारड करायचे त्यांना चार धीर देत डॉक्‍टर पायलट पुढे रुग्णावाहिका दवाखान्याकडे न्यायचे. रुग्णवाहिका आजरा, चंदगड किंवा शाहूवाडीपासून गंभीर रुग्ण कोल्हापुरात सीपीआरमध्ये घेऊन यायचे किंवा सौम्य लक्षणांचा रुग्ण तालुक्‍याच्या कोविड सेंटरवर सोडत होते. 

सलग चार महिने रजा न घेता सेवा 
बहुतेक चालकांनी ड्यूटीच्या वेळ न पाहता, रजेचा हट्ट न करता सलग चार महिने सेवा बजावली आहे. कॉल आला की निघायचे अशीच पध्दत प्रत्येकाने अवलंबली. त्यामुळे साडेआठ हजारांहून अधिक बाधित सुखरूप पोहचविता आले. या सगळ्यात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक किलोमीटर रुग्णवाहिका पळाल्या आहेत. तरी कुठेही एकही सिंगल अपघात नाही की, ब्रेकडाऊन नाही. अशी सेवा देताना कधी एकाच रुग्णवाहिकेत एक-दोन किंवा एकाच वेळी चार पाच कोरोनाबधित व्यक्तींना दवाखान्यात न्यावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT