Padma Bhushan Sri M esakal
कोल्हापूर

'सकाळ'च्या वर्धापन दिन सोहळ्याला जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू Sri M यांची प्रमुख उपस्थिती; कधी आणि कुठे असणार कार्यक्रम?

‘ऊर्जा : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

श्री एम यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यालये आणि स्वित्झर्लंड येथील जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बॅंक, गुगल (अमेरिका), याहू (अमेरिका) आदी अनेक संस्थांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून व्याख्याने दिली आहेत.

कोल्हापूर : संतुलित जीवनाबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानावर स्वार होताना तळागाळातील सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठीही खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ४४ वा वर्धापन दिन (Sakal Anniversary Kolhapur) येत्या गुरुवारी (ता. १ ऑगस्ट) साजरा होणार आहे. जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण श्री एम (Sri M) यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.

‘ऊर्जा : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत. दरम्यान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात (Keshavrao Bhosale Theatre) सायंकाळी साडेपाचला मुख्य सोहळा होईल. ‘सकाळ’चा वर्धापन दिन आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे व्याख्यान हे एक अतूट समीकरण आहे. या सोहळ्याला अनेक नामवंत वक्त्यांची प्रभावळ लाभली आहे.

यंदा हीच परंपरा पद्मभूषण श्री एम पुढे नेणार आहेत. ते सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. त्यांना मुमताज अली या नावानेही ओळखले जाते. जगप्रसिद्ध लेखक आणि वैश्विक वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. अध्यात्म क्षेत्रातील विशेष सेवेसाठी जानेवारी २०२० मध्ये त्यांना शासनाने प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘अॅप्रेंटिस टू अ हिमालयन मास्टर’ हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे आत्मचरित्र देशभरात सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले.

‘विस्डम ऑफ द रिशिज’ आणि ‘द उपनिषद्स’ ही त्यांच्या व्याख्यानांवर आधारित प्रकाशित धर्मशास्त्रीय पुस्तके आहेत. त्यांनी २०१५-१६ मध्ये सर्वांसाठी शांतता, सलोखा आणि समतेचा संदेश देण्यासाठी ‘वॉक ऑफ होप’चे नेतृत्व केले. त्यामध्ये त्यांनी ११ राज्यांतून साडेसात हजार किलोमीटरचे अंतर पार केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा एक असाधारण शांतता उपक्रम असल्याचे समर्थन दिले.

श्री एम यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यालये आणि स्वित्झर्लंड येथील जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बॅंक, गुगल (अमेरिका), याहू (अमेरिका) आदी अनेक संस्थांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून व्याख्याने दिली आहेत. त्यांना विविध आयआयएम्स, आयआयटी (दिल्ली) आणि भारतीय विज्ञान शिक्षण संस्था (बंगळूर) येथे नियमितपणे व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. सध्या ते हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (नॅशनल रिसर्च सेंटर फॉर व्हॅल्यू एज्युकेशन इन इंजिनिअरिंग) विभागात सहायक प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. सत्संग फाऊंडेशन, स्वास्थ्य आणि आरोग्य, शिक्षण, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणाच्या अनेक सामाजिक प्रकल्पांचे नेतृत्वदेखील ते करत आहेत. साहजिकच त्यांचा संवाद म्हणजे उर्जेने भारलेला दिवस ठरणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ परिवारा’ने केले आहे.

असा होईल सोहळा...

  • सायंकाळी ४.३० : अवकाश छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन

  • सायंकाळी ५.३० : मुख्य सोहळा,

  • पाच कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

  • मुख्य सोहळ्यानंतर स्नेहमेळावा

  • सर्व कार्यक्रम संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होतील. पार्किंगची सुविधा प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर असेल.

‘अवकाश-शोध अंतराळाचा’ विशेषांक

वर्धापन दिनानिमित्त ‘अवकाश-शोध अंतराळाचा’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होईल. अवकाश क्षेत्रातील विविध संशोधनांबरोबरच रंजक गोष्टींचा वेध घेणाऱ्या तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा त्यात समावेश असेल. त्याशिवाय, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम केलेल्या पाच कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरवही मुख्य सोहळ्यात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT