zilla parishad kolhapur esakal
कोल्हापूर

कोल्‍हापूर : ४६ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता

सभापती रसिका पाटील यांनी मांडला अर्थसंकल्‍प

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्‍पीय विशेष सर्वसाधारण सभेत अर्थ समिती सभापती रसिका पाटील यांनी २०२१-२२ सालासाठी रुपये ४६ कोटी ४६ लाख ४२ हजारांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्‍प सादर केला. तसेच २०२२-२३ च्या रक्कम रुपये ३३ कोटी ३१ लाख ५३ हजार ५५ रुपये मूळ अंदाजपत्रकाचे सादरीकरणही केले. अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्‍थितीत ही सभा झाली. सदस्यांना प्रत्येकी १० लाखांच्या स्‍वनिधीची घोषणा सभापती पाटील यांनी केली. सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, सभापती वंदना जाधव, कोमल मिसाळ, शिवानी भोसले आदी उपस्‍थित होते.

अर्थसंकल्‍पात शिक्षण विभागास १ कोटी ९८ लाखांची तरतूद केली आहे. यात प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी २७ लाख २ हजाराची भरीव तरतूद केली. बांधकाम विभागासाठी ३ कोटी ३९ लाखांची तरतूद केली आहे. रस्ते सुधारणा करण्यासाठी ८७ लाख, फायर ऑडिटसाठी २५ लाख तर घसारा निधीसाठी ५० लाखांची तरतूद आहे. कृषी विभागासाठी १ कोटी ४३ लाखांची तरतूद आहे. यात कृषी विभागांतर्गत ५० टक्‍के अनुदानावर कडबाकुट्टी मशीन घेण्यासाठी ५० लाख, सुधारित औजारे पुरविणे (पंप) जलसिंचन साधने पुरविणे (इलेक्टीक मोटर/इंजिन) या योजनेंतर्गत ५० लाखांची तर शेतक-यांना पीव्हीसी/एचडीपीई पाईप पुरवठा करणे या योजनेसाठी ३० लाखांची तरतूद केली आहे.

पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी २५ लाखांची तरतूद आहे. यात पशुवैद्यकिय दवाखाने/निवास्थाने दुरुस्ती, विद्युतीकरणासाठी ५२ लाख, आणिबाणीवेळी औषधे, जंतनाशके आदीसाठी १२ लाख, दुग्ध उत्पादन वाढीसाठी २० लाख तर वंधत्व निवारण योजनेसाठी २० लाखांची तरतूद आहे. समाजकल्याण विभागासाठी २ कोटी १० लाखांची तरतूद केली. महिला व बाल कल्याण विभागासाठी १ कोटी ४ लाखांची तरतूद आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी १ कोटी ९ लाखांची तरतूद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT