लसीकरण
लसीकरण sakal
कोल्हापूर

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यात ५० टक्के लसीकरण

सकाळ डिजिटल टीम

जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यात ५० टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाची गती वाढवून कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘जयसिंगपूरसह मोठ्या गावांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्र, २ ग्रामीण रुग्णालये, एक जिल्हा परिषद दवाखान्यांमधून लसीकरण करण्यात येत आहे. शिवाय ज्या गावात आरोग्य उपकेंद्र नाही तेथे शाळांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.’

१८ वर्षांवरील ३ लाख ३६ हजार १४२ नागरिकांचे लसीकरण केले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व १८ वरील नागरिकांचा समावेश आहे. १८ ते ४४ वयोगट- ५८ हजार ७१०, ४५ ते ५९ वयोगट- ५३ हजार ४१८ व ६० वरील वयोगट- ४५ हजार ७५७ असे एकूण १ लाख ६८ हजार ३९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या प्रत्येक आरोग्य केंद्राकडे लसीचा पुरवठा आहे.

१८ वरील सर्व नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोससाठी बाहेर नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, अब्दुललाट, उदगाव, नांदणी, दानोळी या गावांची लोकसंख्या मोठी असल्याने येते लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विषेश प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित गावांतील नियोजन करून लसीकरण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT