कोल्हापूर: दोन गावठी पिस्तूलसह पाच राऊंड जप्त

रेकॉर्डवरील दोघे जण जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
residentional photo
residentional photosakal

कोल्हापूर: रेकॉर्डवरील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. बंडा ऊर्फ रवी प्रल्हाद लोंढे (वय ३०, रा. गंजीमाळ) आणि इम्तीयाज सलीम शेख (वय ३८, रा. जवाहरनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्या दोघांकडून दोन गावठी पिस्तूलासह पाच जीवंत राऊंड असा लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. संभाजीनगर एसटी स्टँन्ड आणि शेंडापार्क परिसरात ही कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

residentional photo
पोहणं पडलं महागात, पाण्यात बुडून एकाचा मृत्यू तर एक जण बेपत्ता

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्सव काळात बेकादेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. त्यानुसार तपास करताना पोलिस निरीक्षक जाधव यांना पोलिस रेकॉर्डवरील संशयित बंडा ऊर्फ रवी लोंढे याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. त्याला गणेशोत्सव कालावधीसाठी शहरात येण्यास व थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तो गावठी पिस्तूल विक्रीसाठी संभाजीनगर एस.टी.स्टॅन्ड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येथे सापळा लावून संशयित बंडा ऊर्फ रवीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रूपये किमंतीचे गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत राऊंड असा एकूण ५० हजार ६०० रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या स्वाधिन केले.

दरम्यान, रेकॉर्डवरील संशयित इम्तीयाज शेख याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. तो ते विकण्यासाठी आज शेंडा पार्क परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. पथकाने येथे सापळा रचून संशयित शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रूपये किमंतीचे गावठी पिस्तूलसह दोन जीवंत राऊंड असा एकूण ५० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्राथमिक तपासात संशयितावर खंडणी, अपहरण व दुखापतीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत असल्याचे जाधव यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक जाधव यांच्यासह कर्मचारी अजय गोडबोले, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील, विजय कारंडे, संतोष पाटील, संजय पडवळ यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com