कोल्हापूर

क्रीडा विकासांतर्गत मंजूर  57 प्रस्तावांना मिळणार निधी...! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे मार्चमध्ये क्रीडा विकासांतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावांना निधी मिळणार आहे. व्यायामशाळा बांधकाम व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी एकूण 57 प्रस्ताव मंजूर झाले असून, कोरोनामुळे निधीला ब्रेक लागणार नाही.

परिणामी ग्रामीण शाळांना क्रीडा विकासासाठी एक पाऊल पुढे टाकता येणार आहे. पुढच्या वर्षी मात्र प्रस्ताव पाठविणाऱ्या शाळा व संस्थांना केवळ 33 टक्के निधी दिला जाणार आहे. 
जिल्हा नियोजन मंडळातून व्यायामशाळा बांधकाम व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी निधीचा पुरवठा केला जातो. शहरासह ग्रामीण भागातील शाळा त्याचा लाभ उठवून क्रीडा विभाग चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. शालेय क्रीडा स्पर्धांत शाळेतील खेळाडू चमकावेत, हा त्यामागील उद्देश असतो. सुसज्ज असा विभाग नसला तरी खेळाडूंचा त्या त्या खेळातील पाया पक्का होईल, याकडे त्यांचे लक्ष असते. यंदा व्यायामशाळा बांधकामासाठी 27 प्रस्ताव क्रीडा कार्यालयाकडे आले होते. त्या सर्वांना मान्यता मिळाली आहे. पाचशे स्क्‍वेअर फूट जागा असणाऱ्यांनी प्रस्ताव केले होते. या निधीतून ते हॉल, दोन चेंजिंग रूम बांधू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना सात लाख रुपये निधी मिळणार आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी 30 अर्जांना मान्यता दिली आहे. सात लाख रुपये निधी योजनेंतर्गत दिला जाणार आहे. संरक्षक भिंत, पाण्याची सोय, भांडारगृह, विविध खेळांची मैदाने तयार करणे, या कामांसाठी तो दिला जात आहे. या दोन वगळता क्रीडा कार्यालयातील अन्य योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. त्यावरही यंदा परिणाम होणार नाही. 


जिल्हा नियोजन मंडळातर्फे निधीचा पुरवठा प्रस्ताव मंजूर झालेल्या शाळा व संस्थांना दिला जाणार आहे. तत्पूर्वी त्यांनी स्वत:कडील 25 टक्के निधी खर्च करायचा आहे. त्याची पाहणी क्रीडा कार्यालयातर्फे केली जाईल. त्यानंतर निधीचा पुरवठा केला जाईल. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT