59 people from other country in kolhapur but test of corona negative in kolhapur 
कोल्हापूर

दिलासादायक ; परदेशातून कोल्हापुरला आलेले ५९ जण निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून ब्रिटनमधील नव्या कोरोना संसर्गामुळे चिंतेचे ढग पुन्हा दाटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने तपासणी केली. यात गेल्या महिन्याभरात एकूण ६२ व्यक्‍ती परदेशातून कोल्हापुरात आल्या आहेत. यांपैकी ५९ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

अन्य तिघांचे २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण झाला आहे. त्यामुळे चाचणी केलेली नाही. जिल्ह्यात ब्रिटनमधून किंवा परदेशातून आलेला एकही नवा कोरोनाबाधित सापडलेला नाही, अशी माहिती आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्‍टरांकडून देण्यात आली.  

आठ महिन्यांत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन होता तसेच कोरोनाच्या संसर्गात अनेकांचे बळी गेले. कोरोनाचे नवे रुग्ण कमी संख्येने का असेना, पण सापडत आहेत. यातच ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाचा कोरोना संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास आरोग्य यंत्रणेने सुरवात केली आहे. परदेशातून आलेल्या ६२ व्यक्ती आढळल्या. पैकी ५९ व्यक्तींची कोरोना तपासणी झाली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे परदेशातून आलेला व सध्या बाधित असलेला एकही रुग्ण नसल्याची माहिती वरिष्ठ डॉक्‍टरांनी दिली. 


ती केवळ चर्चाच!

ब्रिटनमधून आलेल्या दहा व्यक्ती बाधित असल्याची चर्चा होती. आरोग्य यंत्रणेने याचा तपास केला. गेल्या आठ दिवसांत ब्रिटनवरून कोणीही आलेले नाही. कोणाची तपासणी शासकीय प्रयोगशाळेकडे झालेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT