Video Sakal
कोल्हापूर

Video : पश्चिम बंगाल ते कोल्हापूर Via बिहार; 'त्या' 63 मुस्लीम मुलांना घेऊन जाणारा ट्रक पकडला

पश्चिम बंगालमधून केवळ शिक्षणासाठी आजरा येथे मुस्लीम मुले का येतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात संशयितरित्या 63 मुस्लीम मुलांना घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. हे मुले पश्चिम बंगालहून आली असल्याची माहिती असून या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ट्रकचालकाला यासंबंधित विचारले असता त्याने घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

अधिक माहितीनुसार, कोल्हापुरातील रूईकर कॉलनी येथे सकाळी एक ट्रक उभा होता. त्यावेळी त्या ट्रकमध्ये काही मुस्लीम मुले चढताना दिसत होती. बराच वेळ ही हालचाल पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबद्दल ट्रक चालकाला विचारणा केली असता तो फोन आल्याच्या बहाण्याने पळून गेला.

यानंतर या पदाधिकाऱ्यांनी हा ट्रक शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रकमधील मुस्लीम मुलांना विचारणा केली असता ते बिहारमधून आले असल्याचं त्यांनी सांगितलं पण कुठे जाणार असं विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. त्यातील एका जणाकडे पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन ते पुणे स्टेशनपर्यंतचे तिकीट असल्याचं आढळले आहे.

ही मुले कोल्हापुरातील आजरा येथे मदरशात शिक्षणासाठी आले असल्याची माहिती असून ते सुट्टीसाठी गावी गेले होते आणि सुट्टी संपवून ते पुन्हा आजरा येथे शिक्षणासाठी परत येत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

त्यानंतर या मुलांची बालसंकुलात रवानगी करण्यात आली आहे. पण पश्चिम बंगालमधून केवळ शिक्षणासाठी आजरा येथे मुले का येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

Latest Marathi News Live Update : पक्ष काँग्रेसमध्ये विलनी करण्याऐवजी भाजपा सोबत या, रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव

Sangli Rain Update : घाईघाईत पेरणी करताय? सांगली कृषी विभागाचा शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; 'एवढा' पाऊस झाल्याशिवाय पाऊल उचलू नका!

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सोमवारपासून कामगार संघटनेचे घंटानाद आंदोलन, २९ जूनपासून बेमुदत धरणे...

SCROLL FOR NEXT