कोल्हापूर

"शिक्षण सहसंचालक'कडून  647 वैद्यकीय बिले मंजूर 

संदीप खांडेकर

कोल्हापूर  : शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची प्रलंबित 647 वैद्यकीय बिले मंजूर केली आहेत. अद्याप 93 बिलांसंदर्भात कार्यवाही सुरू आहे, त्यांचा आठ दिवसांत निपटारा करण्यात येणार आहे. एकूण बिलांच्या रक्कमेचा आकडा 99 लाख 52 हजार 778 रूपये आहे. मात्र, शासनाने अंदाजपत्रकात तरतूद केल्याखेरीज बिलांची रक्कम प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार नाही. तूर्ततरी रक्कमेसाठी संबंधितांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. वैद्यकीय बिले सादर झाल्यानंतर शासनाने तरतूद केल्याची बिलाची रक्कम दोन-तीन महिन्यांत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हाती पडते. काही वर्षांत शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका संबंधितांना बसला. बिले वेळेवर मिळाली नसल्याचा संताप त्यांच्यात तीव्र झाला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यालयाच्या कार्यपद्धतीचा पंचनामा केला. वैद्यकीय बिलांचा प्रश्‍नही गाजला. विद्यापीठातील कर्मचारी महिलेने 2010चे बिल कार्यालयात देऊनही ते मिळाले नसल्याची तक्रार केली. त्याचबरोबर कार्यालयातून बिल गहाळ झाल्याचाही आरोप केला. शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांच्यासमोरच प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. तत्कालीन शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्या कार्यकाळात काही बिले रोखून धरल्याचा आरोप केला. वैद्यकीय बिलांच्या रक्कमेच्या विषयावर आबिटकर संतापल्यानंतर बिले मंजूर करण्याची कार्यवाही सुरू झाली. जानेवारी 2020 ते आजपर्यंत 740 वैद्यकीय बिले कार्यालयाकडे आली आहेत. त्यापैकी 93 बिलांचा निपटारा करण्याचे काम बाकी आहे. असे सांगण्यात येत आहे. 


ज्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिलाबाबत अडचण आहे. त्यांनी शिक्षण सहसंचालक कार्यालयाशी आठ दिवसांनंतर संपर्क साधावा. त्यांची बिले त्वरीत मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- डॉ. अशोक उबाळे, शिक्षण सहसंचालक. 

18 कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा 
शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या स्थापनेवेळी 53 महाविद्यालये होती. सध्या महाविद्यालयीन 4898, विद्यापीठ 855 असे एकूण 5 हजार 753 कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचा बोजा कार्यालयातील 18 कर्मचाऱ्यांवर आहे. परिणामी रिक्त पदे भरण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT