the 7 the standard pass for sarpanch for all candidates in kolhapur 
कोल्हापूर

आता एवढं शिकलं तरच सरपंच हुनार बरं का ?

सुनील पाटील

कोल्हापूर : ‘शिकून कोण सरपंच झालाय,’ ही ग्रामीण भागातील म्हण आता खोटी ठरणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, १ जानेवारी १९९५ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीस; मग ती पुरुष असो किंवा महिला; तिला किमान सातवीपर्यंत शिक्षण असल्याशिवाय सरपंच होता येणार नाही. 

राज्य निवडणूक आयोग राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेत आहेत. या निवडणुकांमध्ये थेट सरपंच निवडणुकीसाठी २०१८ ला केलेल्या नियमानुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीसाठी किंवा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्‍चित करताना तो उमेदवार २१ वर्षाहून कमी वयाचा नसावा, त्याचे मतदार यादीत नावे असावे, तसेच १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीने इयत्ता सातवीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्याशिवाय सरपंच म्हणून निवडणूक लढवता येणार नसल्याचे नमूद केले आहे.

सातवी पासच्या केलेल्या नियमाचे स्वागत होत आहे. दरम्यान, सरपंच निवडही थेट जनतेतून करण्याऐवजी सदस्यांमधूनच केली जाईल, असाही उल्लेख राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी केला आहे.   

१२७९ ईव्हीएमचे वाटप

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायत मतदानासाठी जिल्ह्यात राखीवसह ४ हजार ९२० ईव्हीएम मशिनचे नियोजन केले आहे. त्यापैकी आज जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांसाठी १ हजार २७९ ईव्हीएम मशिनचे वाटप करण्यात आले. उर्वरित मशिनचे दोन दिवसांत वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ईव्हीएम मशिन वाटप करुन शिल्लक राहिलेली मशिन राखीव म्हणून ठेवली जातील.

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कोणताही कसूर राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानेही काळजीपूर्वक गती घेतली आहे. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींसाठी १७८० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी १९७७ कंट्रोल युनिट व २९४३ बॅलेट युनिट (मतदान मशिन) असे एकूण ४९२० ईव्हीएम मशिनचे नियोजन केले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT