कोल्हापूर

70 वर्षांच्या आउंचा नाद खुळा; पारंपरिक पद्धतीने घोंगडी विणतात अनुआजी

वयाच्या सातव्या वर्षापासून तर आज सत्तराव्या वर्षांपर्यंत हे काम सुरू आहे

स्नेहल कदम

कोल्हापूर : आमच्या सासऱ्यानं हे काम आम्हांसनी शिकवलं. माझं लगीन झालं तवा म्या आठ वर्षाची हुतो. माझा दाखला दहा वर्षाच्या काढला अन् लगीन झालं. कुठ कुणाच्या एक दोनीत जाऊन बसायचं म्हणून सासऱ्यांनी ही कलाकुसर शिकवली. वयाच्या सातव्या वर्षापासून तर आज सत्तराव्या वर्षांपर्यंत हे काम सुरू आहे. वाशी गावच्या अनुबाई पुजारी (anubai pujari) आपल्या पिढीजात घोंगडी विणायच्या कौशल्याबाबत बोलत होत्या.

ही कहाणी आहे ७० वर्षाच्या अनुबाई पुजारी या आजीबाईंची. (kolhapur, vashi) त्या वयाच्या सातव्या वर्षापासून हे काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना याची आवड न्हवती. मात्र कालांतराने ही आवडही वाढत गेली. रहाटा म्हणजेच चरका, तान्हा म्हणजे सूत या गोष्टींच आजूबाजूला असणं, त्यांचं नेहमीच्या सवयीचं बनून गेलं आहे. घरी त्यांची दीडशे मेंढरे आहेत. (sheeps) मुलगा सुनबाई, नातू यांच्या मदतीने आजही त्या हे काम नेटान करत आहेत. हे काम थोडं जिकिरीचं असल्याचे अनुआजी सांगतात. अगदी मेंढरं राखायला जाण्यापासून ते त्यांचे केस कापणे, ते साफ करणे, ती लोकर पिंजने, राहाटाच्या मदतीने ती लोकर पिंजणे अशी काम करावी लागतात. त्यानंतर त्यापासून तान्हा म्हणजेच धागा काढला जातो. तो धागा किंवा तान्हा साळेवर विणला जातो. त्यांनतर तो सलगरकडे पाठवला जातो. सलगर काही दिवस त्या धाग्याला चिंचोक्याच्या खाळीत भिजवून ठेवतो आणि मग एका घरगुती मशीनवर घोंगडी तयार होते.

अनुआजींचा हा पिढीजात व्यवसाय (traditional business) आहे. त्यांच्या सासऱ्याच्या निधनानंतर त्यांनी हा वारसा पुढे चालवला. त्या काळी त्यांच्याकडे घरगुती पद्धतीने लोकर (woolens) पिंजयाची एक धनुष्यबाणा सारखी वस्तू होती. त्यावर हाताने लोकर पिंजता येत होती. पण काळ बदलला आणि पुढे यासाठी मशीन आली. त्याकाळी त्यांच्या सासरे बुवांनी ती मशीन खरेदी करून महिलांचा कामाचा वेग वाढवण्यास हातभार लावला होता, असे त्या सांगतात. मुले, संसार, काम आणि बऱ्याच गोष्टी सांभाळत त्यांनी आवड आणि कलाकुसर जपली आहे. आजही त्या या घोंगडी प्रकारात कौशल्य, नाविन्यपू्र्ण डिझाईन तयार करतात. यामध्ये आता त्यांची पुढची पिढी उतरत आहे. त्यांची सुनबाईही त्यांच्यासोबत या कामात तयार होत आहेत. महिलांनी संसार सांभाळत काही कलाकूसर शिकली तर संसारालात हातभार लागतो, असा मोलाचा संदेश त्या येणाऱ्या पिढीला देतात. आम्ही आमच्या सासरे बुआंच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आता ही आधुनिक पिढी आमच्या हाताखाली तयार होत असल्याचे अनुआजींनी सांगितले.

त्या सांगतात, आजकाल बाजारात अनेक प्रकारचे घोंगडी उपलब्ध आहेत. त्यांचा दर्जानुसार किंमत ठरल्या आहेत. परंतु सध्या लोक घरगुती पद्धतीने बनवलेली घोंगडी हवी अशी मागणी करतात. मात्र बाजारातील सध्या विकायला आलेले बरेचशी घोंगडी ही मशीनवर तयार केलेली असतात. असे घुरगुती पद्धतीत घोंगडे तयार करणारे काहीच लोक आहेत. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. झोपताना ब्लड सर्के्युलेशनसाठीही याचा उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT